Home > News Update > रिक्षाचालकाकडून 40 वर्षीय महिलेवर बलात्कार; रिक्षा चालक अटकेत

रिक्षाचालकाकडून 40 वर्षीय महिलेवर बलात्कार; रिक्षा चालक अटकेत

रिक्षाचालकाकडून 40 वर्षीय महिलेवर बलात्कार; रिक्षा चालक अटकेत
X

भांडुप पूर्व द्रुतगती मार्गावर एका रिक्षाचालकाने 40 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे येथे राहणाऱ्या चाळीस वर्ष महिलेने काही दिवसांपूर्वी रिक्षामधून प्रवास करताना तिच्या नातेवाईकांसोबत मोबाईलवरून संवाद साधताना ती नोकरीच्या शोधात असल्याचे रिक्षाचालकाने ऐकलं आणि त्याने तिला नोकरी देण्याचा आमिष देत तिचा मोबाईल नंबर घेतला यानंतर शनिवारी या रिक्षाचालकाने संबंधित महिलेला फोन करून तिला नोकरीला लावण्यासाठी एका इसमाची भेट घालायची असल्याचं आमिष दाखवलं आणि तो त्या महिलेला भांडुप पूर्व द्रुतगती मार्गावर असलेल्या कांदळ वनात दुपारच्या वेळी घेऊन गेला त्या ठिकाणी त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला आणि जर कोणाला सांगितले तर जिवे ठार मारण्याची धमकी देत त्याने या महिलेला पुन्हा ठाण्यात नेऊन सोडलं. यावेळी त्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र देखील हिसकावून घेतलं आणि त्या ठिकाणाहून तो फरार झाला. पीडित महिलेने वागळे पोलीस स्टेशन गाठून याची माहिती दिली आणि अखेर वागळे पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करून विक्रोळी पोलिस ठाण्यात हा गुन्हा वर्ग केला. त्यानंतर विक्रोळी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर वसई वरून रिक्षाचालक ब्रिज मोहन गिरी याला बेड्या ठोकल्या. दरम्यान ब्रिज मोहनला विक्रोळी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी ठोकवण्यात आली आहे.

Updated : 29 Oct 2021 12:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top