Home > News Update > 4 साधूंना मारहाणीने खळबळ, पण सत्य आले समोर

4 साधूंना मारहाणीने खळबळ, पण सत्य आले समोर

4 साधूंना मारहाणीने खळबळ, पण सत्य आले समोर
X

उत्तर प्रदेशमधील मथुरा येथून देवदर्शनासाठी आलेल्या चार साधूंना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा या गावात गंभीर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. चोर समजून या साधुंना गंभीर मारहाण करण्यात आली आहे. हे साधु उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील आहेत. ते देवदर्शनासाठी कर्नाटकला आले होते. तेथून ते विजापुरवरून जत तालुक्यातील लवंगा या गावाच्या मार्गाने पंढरपूरला देव दर्शनाकरिता निघाले होते. यावेळी या साधूंनी गावातील मंदिरात मुक्काम केला. सकाळी ते साधू त्यांच्या प्रवासाला निघाले असताना त्यांनी एका शाळकरी मुलाला रस्ता विचारला. यातून काही लोकांना ही मुले चोरी करणारे असल्याचा समज झाला. यानंतर ग्रामस्थांनी साधुंकडे चौकशी केली. यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर ग्रामस्थानी त्यांना गाडीतून बाहेर काढत पट्टे,काठ्यांनी जबर मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या साधुंकडे असलेल्या कागदपत्रांच्या आधारे चौकशी केली असता हे सर्व मथुरा येथील श्री पंचनामा जुना आखाड्याचे साधू असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर हा प्रकार गैरसमजुतीतून घडला असल्याने या लोकांविरोधात तक्रार देण्यास साधूंनी नकार दिला आहे, अशी माहिती उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी दिली आहे.

Updated : 14 Sep 2022 6:11 AM GMT
Next Story
Share it
Top