Home > News Update > Pandharpur : कार्तिकी यात्रेला ४ लाख भाविक विठूरायाच्या दर्शनाला

Pandharpur : कार्तिकी यात्रेला ४ लाख भाविक विठूरायाच्या दर्शनाला

Pandharpur : कार्तिकी यात्रेला ४ लाख भाविक विठूरायाच्या दर्शनाला
X

Solapur : कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा गुरुवारी लाखो लोकांच्या उपस्थितीत पंढरीत पार पडत आहे. यात्रेच्या सुरूवातीला पंढरपूरात सुमारे ४ लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. विठुरायाच दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक हे रांगेत उभे आहेत. दर्शनासाठी ११ तास लागत आहेत. ही दर्शनरांग पत्राशेडच्या बाहेर गोपाळपूर रस्त्यावर गेली आहे. दरम्यान, शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सायंकाळी पंढरपुरात दाखल झाले आहेत. सपत्नीक ते विठ्ठल आणि रखुमाईची महापूजा करण्यात आली.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले असून संताचे लहान मोठे पालखी सोहळेही पंढरपुरात दाखल झाले आहेत. कायदा, सुव्यवस्था, गर्दीवरील नियंत्रण सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. याशिवाय वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. पंढरपूर शहरात येणारी जड वाहतूक बंद केली असून या जड वाहनांना पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.

Updated : 23 Nov 2023 4:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top