Home > News Update > प्रवाशांनी लक्ष द्यावं...मध्य रेल्वेकडून तब्बल 38 तासांच्या ब्लॉक

प्रवाशांनी लक्ष द्यावं...मध्य रेल्वेकडून तब्बल 38 तासांच्या ब्लॉक

प्रवाशांनी लक्ष द्यावं...मध्य रेल्वेकडून तब्बल  38 तासांच्या ब्लॉक
X

मध्य रेल्वेकडून 38 तासांचा मोठा ब्लॉक जाहिर कण्यात आला आहे . हा ब्लॉक 30 तारखेला म्हणजेच शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून ते 2 ऑक्टोरपर्यंत दुपारी 1 वाजेपर्यंत असणार आहे. हार्बर रेल्वे मार्गावर तब्बल 38 तासांसाठी हा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. पनवेल उपनगरीय यार्डच्या पुनर्निर्माण कामासाठी, पश्चिम समर्पित फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन 2 नवीन लाईनच्या बांधकामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान हार्बर मार्गावरील उपनगरीय गाड्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे हार्बर तसंच ट्रान्स हार्बरच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. त्यामुळे गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडणं फायद्याचं ठरणार आहे.

यादरम्यान बेलापूर ते पनवेल तसंच ट्रान्स हार्बर लाईनवर अप आणि डाऊन मार्गावर एकही ट्रेन धावणार नाही. 30 तारखेला म्हणजेच शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून ते 2 ऑक्टोरपर्यंत दुपारी 1 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.


ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे ब्लॉक

या कालावधीत हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील बेलापूर आणि पनवेल स्थानकादरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध होणार नाहीत.

- हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा बेलापूर, नेरूळ आणि वाशी स्थानकांवरील शॉर्ट टर्मिनेट/ ओरीजनेट होतील.

- ट्रान्स हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा फक्त ठाणे आणि नेरुळ/वाशी स्थानकांदरम्यान धावणार आहेत

- ब्लॉक सुरू होण्यापूर्वी डाऊन हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ट्रेन 21.02 वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि 30.09.2023 रोजी 10.22 वाजता पनवेलला पोहोचेल.

- अप हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल 10.35 वाजता पनवेलहून सुटेल आणि 30.09.2023 रोजी 11.54 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

- ब्लॉकच्या आधी डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ठाणे रात्री 9.36 वाजता सुटेल आणि 30.09.2023 रोजी 10.28 वाजता पनवेलला पोहोचेल.

- ट्रान्स-हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल 9.20 वाजता पनवेलहून सुटेल आणि 30.09.2023 रोजी 22.12 वाजता ठाण्याला पोहोचेल.

- पनवेलसाठी CSMT पासून ब्लॉक नंतर पहिली लोकल ट्रेन CSMT वरून 12.08 वाजता सुटेल आणि 02.10.2023 रोजी 1.29 वाजता पनवेलला पोहोचेल.

- ब्लॉकनंतर पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल पनवेलहून 1.37 वाजता सुटेल आणि 02.10.2023 रोजी 2.56 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

- ठाण्याहून पनवेलसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल ठाण्याहून 1.24 वाजता सुटेल आणि 02.10.2023 रोजी 2.16 वाजता पनवेलला पोहोचेल.

- ब्लॉकनंतर पनवेलहून ठाण्याच्या दिशेने पहिली लोकल ट्रेन पनवेलहून 2.01 वाजता सुटेल आणि 02.10.2023 रोजी ठाण्यात 2.54 वाजता पोहोचेल.

Updated : 29 Sep 2023 3:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top