Home > News Update > अहमदनगर जिल्ह्यात मागील 24 तासात 374 बालके कोरोना पॉझिटिव्ह: 180 म्युकोरमायकोसिस रुग्णापैकी 4 रुग्णांचा मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यात मागील 24 तासात 374 बालके कोरोना पॉझिटिव्ह: 180 म्युकोरमायकोसिस रुग्णापैकी 4 रुग्णांचा मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यात मागील 24 तासात 374 बालके कोरोना पॉझिटिव्ह: 180 म्युकोरमायकोसिस रुग्णापैकी 4 रुग्णांचा मृत्यू
X

कोविड सेंटरमधील पूजापाठ आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना एका दिवसात दोन हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद होणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस ग्रामीण भागातही करुणा चा संसर्ग वाढत असताना गेल्या 24 तासात 364 बालक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात आज 180 म्युकोरमायकोसिस चे रुग्ण आढळून आले त्यापैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील पोखरणा यांनी दिली आहे

अहमदनगर वरून सुनील भोंगळ यांचा रिपोर्ट..

कोविड संकटामध्ये अहमदनगर जिल्ह्यातून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या 24 तासात अहमदनगर जिल्ह्यात 374 लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे मत तज्ञानी व्यक्त केले आहे. ज्यामुळे प्रशासनाकडून पालकांना मुलांची काळजी घेण्यास सांगितले जात आहे. परंतु, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात मागील 24 तासात 374 लहान मुलांना कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने चिंता वाढली आहे. यामध्ये 1 वर्ष ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचा समावेश आहे.दरम्यान 374 बालके कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. मागील 24 तासात अहमदनगर जिल्ह्यात 1000 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.एकीकडे रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना दुसरीकडे लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Updated : 24 May 2021 3:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top