#कोरोनाचा_कहर – पुणे जिल्ह्यात दिवसभरात 358 नवीन रुग्ण

1273
Pune corona update

पुणे जिल्ह्यात कोरोनाबादीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शुक्रवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात 358 नवीन रुग्ण आढळले आहेत. यातील 317 रुग्ण हे पुणे शहरात आहेत. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 हजार 167 झाली आहे. यातील 4 हजार 471 रुग्ण पुणे शहरातील आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णांची संख्या 253 आहे. तर पुणे ग्रामीणमध्ये ही संख्या 141 झाली आहे.

काँटोन्मेन्ट आणि नगरपालिका हद्दीतील रुग्णांची संख्या 302वर पोहोचली आहे. तर पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 257 रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील 228 मृत्यू हे पुणे शहरात झाले आहेत. पण दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत पुणे जिल्ह्यात 2 हजार 770 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये पुण्यातील 2 हजार 371 रुग्णांचा समावेश आहे.