Home > News Update > कोजागिरी पौर्णिमा काळात 3 दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी

कोजागिरी पौर्णिमा काळात 3 दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी

कोजागिरी पौर्णिमा काळात 3 दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी
X

उस्मानाबाद : कोजागिरी पौर्णिमा काळात 3 दिवस उस्मानाबाद जिल्हाबंदी असणार आहे, या काळात तुळजापूर शहरात संचारबंदी आदेश लागू असणार आहेत. पौर्णिमाला महाराष्ट्र, कर्नाटक , आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यासह देशभरातुन नागरिक तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात, त्यामुळे या 3 दिवसात एकही वाहन किंवा भाविक जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही असं जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले आहे.

पौर्णिमेच्या आगोदर एक दिवस पौर्णिमेच्या दिवशी व पौर्णिमेनंतर एक दिवस असे तीन दिवस तुळजापूरात संचारबंदी राहील तर उस्मानाबाद जिल्हा सीमा बंदी लागू असणार आहे.या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करून तिथे पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी यांचा कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे. त्यानुसार तुळजापूर शहरात व उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असं कौस्तुभ दिवेगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

Updated : 18 Oct 2021 1:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top