Top
Home > News Update > रायगड जिल्ह्यातील ६ गावे कोरोनाचे हॉटस्पॉट तर २५१ गावे कोरोनामुक्त

रायगड जिल्ह्यातील ६ गावे कोरोनाचे हॉटस्पॉट तर २५१ गावे कोरोनामुक्त

रायगड जिल्ह्यातील ६ गावे कोरोनाचे हॉटस्पॉट तर २५१ गावे कोरोनामुक्त
X

रायगड - राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. पण रायगड जिल्ह्यातील ६ गावांमध्ये मात्र रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसले आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्युदर देखील वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र अलिबाग तालुक्यातल६ गावे 251 villages are covid free now in raigad districtकोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहेत. त्यामुळे।ही 6 गावे ' मायक्रो कंटेन्मेंट झोन ' घोषित करण्यात आली आहेत . यामध्ये सासवणे , नागांव , कुरुळ , नवेदर नवगांव , चौल व रेवदंडा या गावांचा समावेश आहे . कोळीवाडा १, सासवणेतील सासवणे नागांव ग्रामपंचायतमधील नागाव बंदर आणि खारगल्ली कुरुळ मेटपाडा , नवेदर नवगांव , चौल व रेवदंडा हा भाग ' मायक्रो कंटेन्मेंट झोन ' घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही नियम घालण्यात आले असून , याबाबतचे आदेश तहसीलदार सचिन शेजाळ यांनी जारी केले आहेत .

जिल्ह्यातील २५१ गावे झाली कोरोनामुक्त

एकाकडे ६ गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर असली तरी रायगड जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळालेला दिसतोय.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी , प्रशासनाने गावपातळीवर राबविलेल्या विविध उपाययोजना यामुळे रायगड जिल्ह्यातील गावे टप्प्याटप्प्याने कोरोनामुक्त होत आहेत . जिल्ह्यातील एक हजार ९ १२ महसुली गावांपैकी २५१ गावे कोरोनामुक्त झाली असून या गावांमध्ये सद्यस्थितीत एकही कोरोना रुग्ण नाही . जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . किरण पाटील यांनी दिली. ग्रामीण भागातील नागरिकांची उपाययोजनांना साथ मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींमध्ये एक हजार ९ १२ महसुली गावे असून यामधील १६२ ग्रामपंचायतींमधील २५१ गावे कोरोनामुक्त झाली आहेत .

Updated : 12 Jun 2021 8:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top