Home > News Update > देवेंद्र फडणवीस यांच्या काळात २५ हजार कोटींचा घोटाळा- संजय राऊत

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात २५ हजार कोटींचा घोटाळा- संजय राऊत

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात २५ हजार कोटींचा घोटाळा- संजय राऊत
X

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या ज्या पत्रकार परिषदेची चर्चा संपूर्ण राज्यभरात होती, ती पत्रकार परिषद अखेर शिवसेना भवनमध्ये पार पडली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना अपेक्षेप्रमाणे आपल्या शैलीत भाजपवर हल्ला केला. यावेळी शिवसेना भवनावर असंख्य शिवसैनिक जमा झाले होते. तसेच भाजपविरोधातही जोरदार घोषणाबाजी कऱण्यात आली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला सरकार पाडण्यासाठी ऑफर दिल्याचा आरोपही संजय राऊत यांनी सुरूवातीला केला.

आपल्याकडे 5 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा हिशोब आहे, फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा झाला. महाआयाटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असा आरोप संजय राऊत यांनी केला. पण त्यानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली. येत्या काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील तसेच अनिल देशमुख बाहेर येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला होता, त्यामुळे कुणाचे नाव घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यामध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, त्यांचा मुलगा नील सोमय्या आणि मोहीत कम्बोज यांचे नाव घेऊन गंभीर आरोप केले.

ईडी, सीबीआयच्या माध्यमातून भाजपा ठाकरे परिवारावर चिखलफेक करत असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी सुरूवात केली. भाजपने कितीही धमक्या दिल्या तरी ठाकरे सरकार पडणार नाही, असा इशारा देत आजही पत्रकार परिषद ही फक्त ट्रेलर होती. आता यापुढे आणखी कागदपत्रं, आणखी व्हिडिओ समोर येतील, उद्यापासून राज्यातील जनतेला सर्व कळेल असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

ED वाल्यांनी आपल्याला अटक करावी, माझ्या घरी या असे थेट आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे. पण जितेंद्र नवलानी नाव ऐकल्यावर मुंबई आणि दिल्लीतील ED च्या अधिकाऱ्यांना घाम फुटेल असा इशारा त्यांनी दिला, त्याचबरोबर ४ महिन्यांपासून ED च्या नावावर वसुली करण्यात आली आहे, ७० बिल्डर्सकडून पैसे वसुली सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

त्याचवेळी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान हा किरीट सोमय्या यांच्या मुलाचा व्यावसायिक भागीजार आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच राकेश वाधवानने भाजपला वीस कोटी रुपये देणगी दिली आहे, असाही दावा त्यांनी केला. निकॉन इन्फ्रा ही कंपनी किरीट सोमय्यांची असून राकेश वाधवानही त्यात भागिदार आहे,असा आरोप त्यांनी केला.Updated : 15 Feb 2022 12:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top