Top
Home > News Update > पुण्यात 24 तासात कोरोनाचे 202 नवीन रुग्ण, 9 जणांचा मृत्यू

पुण्यात 24 तासात कोरोनाचे 202 नवीन रुग्ण, 9 जणांचा मृत्यू

पुण्यात 24 तासात कोरोनाचे 202 नवीन रुग्ण, 9 जणांचा मृत्यू
X

मुंबईनंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या पुणे जिल्ह्यात आता परिस्थिती आणखी चिंताजनक बनत चालली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात कोरोनाचे 228 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 11 जणांचा बळी गेला आहे. तर यातील 202 नवीन रुग्ण हे पुणे शहरात सापडले आहेत. पुण्यात आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. शहरात दिवसभरात 9 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 197 झाली आहे. पुणे जिल्ह्यात शनिवारी मृत्यू झालेल्यांमध्ये 3 महिला, 7 पुरुष आणि एका तृतीयपंथी रुग्णाचा समावेश आहे. तर पुणे शहरातील मृतांची एकूण संख्या 173 झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरात 24 तासात 7 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर काँटोन्मेन्ट आणि नगरपालिका क्षेत्रात 24 तासात 10 रुग्ण वाढले आहेत. पुणे ग्रामीण मध्ये 9 नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान गेल्या 24 तासात 73 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यातील 68 रुग्ण हे पुणे शहरातील आहेत. तर पिंपरी चिंचवड शहरात 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुणे ग्रामीणमध्ये दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 हजार 795 असून पुणे शहरातील रुग्णांची संख्या 3 हजार 308 आहे. दरम्या पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 952 झाली आहे, तर यातील 1 हजार 698 रुग्ण हे पुणे शहरातील आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील 113 आणि काँटोन्मेन्ट, नगरपालिका आणि ग्रामीण हद्दीतील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 148 आहे.

Updated : 17 May 2020 2:58 AM GMT
Next Story
Share it
Top