Home > News Update > रायगड जिल्ह्यात 20 व्हेंटिलेटर वापरावीना धूळखात पडून

रायगड जिल्ह्यात 20 व्हेंटिलेटर वापरावीना धूळखात पडून

रायगड जिल्ह्यात 20 व्हेंटिलेटर वापरावीना धूळखात पडून
X

राज्यभरात कोरोनाचा उद्रेक होत असताना रायगड जिल्ह्यातही कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत आहे. एका दिवसाला दीड हजाराच्या घरात रुग्ण आढळत आहेत, अशातच व्हेंटिलेटर अभावी रुग्ण तडफडून मरत

असताना रायगड जिल्ह्यातील 20 व्हेंटिलेटर वापरावीना धूळखात पडले असल्याने संताप व्यक्त होतोय.

उपचारासाठी कोणाला ऑक्सिजन लागत आहे, तर कोणाला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत आहे. मात्र, बेडची कमतरता जाणवत असल्याने उपचारात अडचणी येत आहेत.

सरकारने रायगड जिल्ह्यासाठी २५ व्हेंटिलेटर पाठवले होते. मात्र, त्यातील २० व्हेंटिलेटर सध्या धूळखात पडले आहेत. आरोग्य विभागाकडे कुशल मनुष्यबळ नसल्याने व्हेटिलेटरचा वापरच होत नसल्याचे समोर आले आहे.

पहिल्या लाटेच्या वेळी सरकारने २५ व्हेंटिलेटर जिल्ह्यासाठी दिले होते. व्हेंटिलेटरवरील सपोर्ट रुग्णांसाठी वरदान ठरणारा आहे. मृत्यूला रोखण्याचे सामर्थ्य हा यंत्रामध्ये आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरची अतिशय गरज असतानाही त्याचा वापर होताना दिसत नाही.

आरोग्य यंत्रणेकडे आधीच मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यातच त्यांना भागवावे लागत आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर उपलब्ध असतानाही त्यांचा वापर करता येत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. एखाद्या ठिकाणी व्हेंटिलेटरची गरज आहे हे मान्य, परंतु तेथे फिजिशियन डॉक्टर नसेल तर

व्हेंटिलेटरचा उपयोग कसा करणार, त्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचीही गरज आहे. त्यामुळे गरज असतानाही त्यांचा वापर करता येत नसल्याची खंत आरोग्य विभागातील एका डॉक्टरने व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी कळंबोळी येथील स्वस्थ रुग्णालयाने पाच व्हेंटिलेटरची मागणी केली होती.

रुग्णांच्या सेवेसाठी त्याचा उपयोग होणार असल्याने तातडीने स्वस्थ रुग्णालयाला कर्ज स्वरूपात व्हेंटिलेटर देऊ केल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बोलताना सांगितले. अद्यापही २० व्हेंटिलेटर शिल्लक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .

जिल्ह्यात एकूण २१५ व्हेंटिलेटर बेड आहेत. रायगड ग्रामीण रुग्णालयात १८ व्हेंटिलेटर आणि पनवेल महापालिका क्षेत्रात १०१ असे एकूण ११९ व्हेंटिलेटर वापरात आहेत. काही ठिकाणच्या रुग्णालयातील रुग्णांना कधीही व्हेंटिलेटरची आवश्यकता लागू शकते.

मात्र, तेथे तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने व्हेंटिलेटरचा काहीच उपयोग होणार नाही. यासाठी प्रशासनाने खासगी डॉक्टरांच्या मदतीने सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटरचा वापर करण्याचे ठरवले होते. मात्र, खाजगी डॉक्टर स्वत: च त्यांच्या रुग्णालयात रुग्णांना उपचार देत आहेत.

Updated : 29 April 2021 10:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top