Home > News Update > #ViralVideo : बसचालकाला भररस्त्यात मारहाण करत रोखली बंदुक, पोलिसांनी दिला दणका

#ViralVideo : बसचालकाला भररस्त्यात मारहाण करत रोखली बंदुक, पोलिसांनी दिला दणका

#ViralVideo : बसचालकाला भररस्त्यात मारहाण करत रोखली बंदुक, पोलिसांनी दिला दणका
X

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये कारमधून उतरुन एक व्यक्ती बसमध्ये चढते आणि चालकाला माराहण करत आहे. तर दुसरी व्यक्ती चालकाला थेट बंदुकीचा धाक दाखवत मारण्याची धमकी देत आहे. हा व्हिडिओ रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ इथला असल्याचे सांगितले जात आहे.

कार आणि जेएसडब्ल्यु बसचालक या दोघांमध्ये पेणमध्ये बाचाबाची झाली. यानंतर संतप्त कारचालकांनी बसचालकाला थांबण्याचा इशारा दिला, पण बसचालक न थांबता पुढे निघून गेला. कारचालकांनी त्याचा पाठलाग केला आणि वडखळजवळ कार बसच्या पुढे उभी करुन दोघांनी शिवीगाळ करत बसचालकावर बंदूक रोखली, या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली.

Updated : 30 Jan 2022 10:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top