Home > News Update > 1993 बाँबस्फोटातील दाऊदचा निकटवर्तीय अटकेत, लवकरच भारतात प्रत्यार्पण

1993 बाँबस्फोटातील दाऊदचा निकटवर्तीय अटकेत, लवकरच भारतात प्रत्यार्पण

1993 साली देशाला हादरवणाऱ्या मुंबई बाँबस्फोटातील आरोपी आणि दाऊदचा निकटवर्तीय असलेला अबु बकर याला दुबईत अटक करण्यात आले असून लवकरच त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

1993 बाँबस्फोटातील दाऊदचा निकटवर्तीय अटकेत, लवकरच भारतात प्रत्यार्पण
X

1993 साली साखळी बाँबस्फोटाने मुंबई हादरली होती. तर तो बाँबस्फोट देशातील सर्वात मोठा बाँबस्फोट असल्याचे म्हटले जात होते. या बाँबस्फोटात 257 लोकांचा मृत्यू तर 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. तर या बाँबस्फोटात दाऊदचा निकटवर्तीय असलेल्या अबु बकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून लवकरच त्याचे भारतात प्रत्यार्पण होईल,असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

1993 साली मुंबईतील विविध भागात 12 साखळी बाँबस्फोट झाले होते. यामध्ये 257 लोकांचा मृत्यू तर 700 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. या बाँबस्फोटातील आरोपींनी विदेशात पोबारा केला होता. मात्र अखेर 29 वर्षानंतर दाऊदचा निकटवर्तीय असलेला अबु बकर उर्फ अबु अब्दुल गफुर शेख याला अटक करण्यात आली आहे. तर परदेशातील मोठ्या ऑपरेशनमध्ये मुंबई साखळी बाँबस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकरला संयुक्त अरब अमिरातमधून अटक केल्याने भारतीय एजन्सीला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

याबाबत इंडिया टुडेने वृत्त देताना म्हटले आहे की, अबू बकर हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी प्रशिक्षण देत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तर मुंबईतील साखळी बाँबस्फोटात वापण्यात आलेले आरडीएक्स लँडिंगसह दाऊदसोबत दुबईतून कट रचण्यात अबू बकरचा सहभाग होता. त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा अबू बकरच्या मागावर होत्या. मात्र 29 वर्षांनी अबू बकर भारतीय यंत्रणांच्या हाती लागल्याने हे यंत्रणांचे मोठे यश मानले जात आहे. तर अबू बकरची प्रत्यार्पण प्रक्रीया संपून लवकरच त्याला भारतात आणले जाणार आहे.

कोण आहे अबू बकर

अबू बकर म्हणजेच अबू अब्दुल गफुर शेख. दाऊद टोळीचे प्रमुख असलेल्या लेफ्टनंट मोहम्मद आणि मुस्तफा डोसा यांच्यासोबत अबू बकर आणि दाऊद यांनी 1993 साखळी बाँबस्फोटाचा कट रचला. त्यानंतर अबू बकर पाकव्याप्त काश्मीर आणि संयुक्त अरब अमिरातमधून तस्करी करत होता. दरम्यान 1997 मध्ये रेड कॉर्नर नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र त्यानंतर 2019 मध्ये अबू बकरला अटक करण्यात आली होती. मात्र त्यावेळी अबू बकर युएई पोलिसांच्या ताब्यातून निसटण्यात यशस्वी झाला होता. मात्र त्यानंतर अखेर अबू बकरला अटक करण्यात आल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

कोणत्या ठिकाणी घडला होता बाँबस्फोट

12 मार्च 1993 साली 12 जागांवर बाँबस्फोट झाला होता. त्यामध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 713 लोक गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी मुंबईतील बाँबे स्टॉक एक्स्चेंज, नरसी नाथ स्ट्रीट, शिवसेना भवन, सेंचुरी बाजार, माहिम, झावेरी बाजार, सी रॉक हॉटेल, प्लाजा सिनेमा, जुहू सेंट्रल हॉटेल, सहारा विमानतळ, आणि एअरपोर्ट सेंट्रल हॉटेलच्या आसपास साखळी बाँबस्फोट करण्यात आला होता.

काय घडले न्यायालयात

1993 साली मुंबईत घडलेल्या बाँबस्फोटासंदर्भात 4 नोव्हेंबर 1993 रोजी 1000 पानांचे चार्जशीट दाखल करण्यात आली. ज्यामध्ये 189 लोकांवर आरोप ठेवण्यात आला होता. त्यामध्ये दाऊद इब्राहिमला मुख्य आरोपी करण्यात आले होते. मात्र अजूनही दाऊदला पकडण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले नाही. त्यासोबतच 2006 साली मुंबई न्यायालयाने टायगर मेमन, याकुब मेमन, युसुफ मेमन यांना फाशी सुनावण्यात आली. तर 2017 साली मुस्तफा डौसाचा मृत्यू झाला होता.

Updated : 6 Feb 2022 3:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top