Home > News Update > जायकवाडीचा विसर्ग वाढवला; गोदा काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

जायकवाडीचा विसर्ग वाढवला; गोदा काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

जायकवाडीचा विसर्ग वाढवला;  गोदा काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
X

आशिया खंडातील सर्वात मोठे मातीच धरण समजल्या जाणार्‍या जायकवाडी धरणातून सकाळी 12 वाजेच्या दरम्यान पाणी सोडण्यात आले आहे. तर जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून सुरवातीला 10 हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, मात्र आता हा वेग 66 हजार 24 करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात कालपासून होत असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या वरील भागातील सर्वच धरणं जवळपास तुडुंब भरली आहे.त्यामुळे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा गोदावरी पात्रात सोडण्यात आला आहे.सद्या एक लाखांपेक्षा अधिक आवक जायकवाडी धरणात सुरू आहे.त्यामुळे गोदा काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सुरवातीला धरणाचे 18 दरवाजे अडीच फुटाने उचलण्यात आले होते. मात्र आता पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून, साडेतीन फुट दरवाजे उचलण्यात आले आहे. तर जायकवाडी धरणातून सद्या 66 हजार 24 क्युसेस ने पाणी सोडण्यात येत आहे.

Updated : 29 Sep 2021 12:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top