Home > News Update > देशात २४ तासात ७७ रुग्णांचा मृत्यू

देशात २४ तासात ७७ रुग्णांचा मृत्यू

देशात २४ तासात ७७ रुग्णांचा मृत्यू
X

देशभरात गेल्या २४ तासात नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १ हजार ७५५ ने वाढल्याने आता एकूण रुग्णांची संख्या ३५ हजार ३६५ झाली आहे. तर २४ तासांत ७७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींची एकूण संख्या १ हजार १५२ झाली आहे. तर केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९ हजार ६४वर पोहोचली आहे.

दरम्यान ४ मे पासून लॉकडाऊन वाढवण्यात आल्याच्या निर्णय़ानंतर केंद्रीय गृहविभागाने नवीन मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत. यामध्ये कोरोनाच्या प्रसारानुसार रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन ठरवण्यात आले आहेत. ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सवलत दिली जाणार आहे. पण नागरिकांनी खबरदारीच्या सर्व नियमांचे पालन करण्याची सूचनाही सरकारनं केली आहे.

Updated : 2 May 2020 2:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top