Home > News Update > 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
X

6 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तातडीने घेण्यासाठी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

16 आमदारांच्या याचिकेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी विशिष्ट वेळेत निर्णय घ्यावा, अशी मागणी करत ठाकरे गटाचे नेते सुनिल प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

ठाकरे गटाचे नेते सुनिल प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत म्हटले आहे की, विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तातडीने घ्यावा.

२) सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र त्यानंतर दोन महिने पूर्ण झाल्यानंतरही त्यावर विधानसभा अध्यक्षांकडून 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासंदर्भात कुठल्याही हालचाली सुरु नाहीत.

३) राहुल नार्वेकर हे 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी विलंब करत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

४) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय वेळेत निर्णय घेण्याचे निर्देश दिलेले आहेत.

५) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बोलताना न्यायालयाने वाजवी वेळेत निर्णय घ्यावेत, असं म्हटल्याचंही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

या ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेले आहे.


Updated : 14 July 2023 6:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top