Home > News Update > महाराष्ट्रात रस्ते अपघातात 15 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू.

महाराष्ट्रात रस्ते अपघातात 15 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू.

महाराष्ट्रात रस्ते अपघातात 15 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू.
X

महाराष्ट्रातील रस्ते अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामंही मोठ्याप्रमाणात सुरु आहेत. २०२२ आणि २०२३ या वर्षाची आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी याची माहिती दिली आहे.

यामध्ये सर्वाधिक दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला आहे. या वर्षभरात 2022 मध्ये महाराष्ट्रात 15,000 हून अधिक लोकांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात रस्त्याची दूरावस्ता, ओवर स्पीड, अपघाती वळण, ड्रिंक अँड ड्राईव्ह यामुळे राज्यभरात रस्ते अपघाताच प्रमाण वाढलं आहे.



अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी 57% दुचाकीस्वार आणि 21% पादचारी आहेत. जानेवारी 2023 ते एप्रिल 2023 पर्यंत राज्यात रस्ते अपघातात 4,922 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 6,845 लोक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी एका वृत्त संस्थेला दिली आहे. त्यामुळे वाहनांचा वेग मर्यादीत ठेवून सुरक्षित प्रवास करावा.





Updated : 24 May 2023 10:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top