Home > News Update > इगतपुरी येथील एका आश्रम शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

इगतपुरी येथील एका आश्रम शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

इगतपुरी येथील एका आश्रम शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
X

नाशिक // कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने राज्यातील निर्बंध हटवण्यात आले. शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात आले. पण, नाशिकमधून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील एका शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

इगतपुरीतील मुंढेगाव येथील आश्रमशाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या आश्रमशाळेत तीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर इतरही विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करण्यात आली.

या चाचणीत एकूण 15 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले. बाधित विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. आश्रमशाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांसह इतर 340 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळेत काम करणारे इतर कर्मचाऱ्यांचीही कोविड चाचणी करण्यात आली आहे.

Updated : 10 Dec 2021 5:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top