Home > News Update > #Mumbairains : पावसाचे 14 बळी, चेंबुरमध्ये भिंत पडून 11, तर विक्रोळीत तिघांचा मृत्यू

#Mumbairains : पावसाचे 14 बळी, चेंबुरमध्ये भिंत पडून 11, तर विक्रोळीत तिघांचा मृत्यू

#Mumbairains : पावसाचे 14 बळी, चेंबुरमध्ये भिंत पडून 11, तर विक्रोळीत तिघांचा मृत्यू
X

मुंबईत शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे 14 जणांचा बळी गेला आहे. चेंबुरमध्ये झोडपड्यांवर भिंत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाल आहे. तर विक्रोळीत दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. चेंबुरमधील भारतनगरमध्ये काही झोपड्यांवर भिंत कोसळली आहे. या ठिकाणी NDRFची टीम बचावकार्यासाठी दाखल झाली आहे. भिंतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 16 जणांचा बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी काही जण गंभीर जखमी झाले आहेत,. तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

तर विक्रोळीमध्ये काही घरांवर दरड कोसळल्याने 3 जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे, यात किती लोक अडकले आहेत, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पण आता पावसाचा जोर कमी झाल्याने मदतकार्याला वेग आला आहे,

मुंबईत रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणा भरल्याने अनेक घरांमध्येही पाणी शिरले. सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला. त्यानंतर काही भागात साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. पण मिठी नदीला पूर आला असून महापालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबईने हवामान विभागाने रात्री साडे बारानंतर पुढच्या ३ तासात मुंबईतील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे मुंबईत मुसळधार पाऊस झाला आहे. विक्रोळीमध्ये काही झोपड्यांवर दरड कोसळल्याचेही वृत्त आहे. बोरिवली पूर्वेला काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने चारचाकी गाड्याही वाहून गेल्याची दृश्य सध्या व्हायरल होत आहेत.

Updated : 18 July 2021 2:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top