Home > News Update > २४ तासात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येचा उच्चांक

२४ तासात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येचा उच्चांक

२४ तासात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येचा उच्चांक
X

देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या २४ तासात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एका दिवसात कोरोनाचे १२ हजार ८८१ नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतचा हा उच्चांक ठरला आहे.

तर ३३४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १२ हजार २३७ झाली आहे. तर कोरोनाबाधीत एकूण रुग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ९४६ एवढी झाली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे यापैकी १ लाख ९४ हजार ३२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

हे ही वाचा..

दिलासादायक- कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले

राज्यात ‘या’ ६ जिल्ह्यात कोरोनाचे 1 हजारांपेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण

Online Education: मोबाईल व्हॅन, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ठरु शकते वरदान!: तानाजी कांबळे

तर १ लाख ६० हजार ३८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या ३ दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ११ हजारांच्या खाली नोंदवली जात होती. पण आज १३ हजारांच्या जवळपास ही संख्या नोंदवली गेली आहे.

Updated : 18 Jun 2020 10:23 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top