दिलासादायक – 24 तासात कोरोनाचे १ हजार ७४ रुग्ण कोरोनामुक्त

Courtesy : Social Media

गेल्या २४ तासात कोरोनाचे २ हजार ५५३ नवीन रुग्ण आढळल्याने आता देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ४४ हजार ५३२वर पोहोचली आहे. तर 24 तासात ८४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आता एकूण कोरोनाबळीची संख्या १ हजार ३८९ वर पोहोचली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे २४ तासात १ हजार ७४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११ हजारांच्यावर पोहोचली आहे. तसंच आता कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण २७.५२ टक्क्यांवर पोहोचले आहे.