Top
Home > News Update > नक्षलवाद्यांचा मोठा घातपात उधळला!

नक्षलवाद्यांचा मोठा घातपात उधळला!

नक्षलवाद्यांचा मोठा घातपात उधळला!
X

उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र गट्टा(जां) हद्दीतील मौजा येलदडमी जंगल परिसरात सी 60 चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित असताना आज सायंकाळी ५.३० वा. सुमारास नक्षलवाद्यांनी जवानांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर गोळीबार केला. स्वसंरक्षणार्थ व प्रत्युत्तरादाखल सी ६० कमांडोनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. सुमारे अर्धा तास चाललेल्या गोळीबारानंतर सी ६० कमांडो चा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलात पळ काढला.

घटनास्थळी सी ६० जवानांनी शोध अभियान राबविले असता ०१ पुरुष नक्षलवादी मृत अवस्थेत आढळून आला.सदर जंगल परिसरात पाहणी केली असता देशविघातक कृती करण्यासाठी नक्षलवादीनी कॅम्प उभारला असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे ०१ हत्यार, २० पिट्टू तसेच मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य मिळून आले.

सदर घटनेत मृत पुरुष नक्षलवाद्याची ओळख पटविणे बाकी असून घटनेनंतर सदर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.

Updated : 3 July 2020 6:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top