Home > News Update > कोविडसंदर्भात १ लाख ६१ हजार गुन्हे दाखल; २९ हजार ९९० व्यक्तींना अटक

कोविडसंदर्भात १ लाख ६१ हजार गुन्हे दाखल; २९ हजार ९९० व्यक्तींना अटक

कोविडसंदर्भात १ लाख ६१ हजार गुन्हे दाखल; २९ हजार ९९० व्यक्तींना अटक
X

मुंबई, दि. १० : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ६१ हजार ८२१ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच २९ हजार ९९० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ७५ हजार ०६३ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते ९ जुलै या कालावधीत

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३०५ (८६७ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०६ हजार २००

राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८०१ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५

जप्त केलेली वाहने – ८९ हजार ४५९.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ७४

(मुंबईतील ४२ पोलीस व ३ अधिकारी असे एकूण ४५, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३, नाशिक शहर १, एटीएस १, मुंबई रेल्वे ४, ठाणे शहर ५ , ठाणे ग्रामीण १ पोलीस, १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर १, रायगड १, जालना एसआरपीएफ १ अधिकारी १ पोलीस, अमरावती शहर १ wpc, उस्मानाबाद-१, नवी मुंबई एसआरपीएफ १ अधिकारी)

कोरोनाबाधित पोलीस – १२६ पोलीस अधिकारी व १०२0 पोलीस कर्मचारी

हे ही वाचा..

आयडीबीआय बँकेच्यावतीने ४० लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द

राज्यातील होम क्वारंटाईनची संख्या किती आहे? तुम्हाला माहिती आहे का?

…तर पुन्हा लॉकडाऊन: अजित पवार

Source: Maharashtra Govt now

Updated : 11 July 2020 2:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top