Home > News Update > गुन्हा सिध्द करण्यासाठी पोलिसांच्या नाकीनऊ येईल- जितेंद्र आव्हाड

गुन्हा सिध्द करण्यासाठी पोलिसांच्या नाकीनऊ येईल- जितेंद्र आव्हाड

हर हर महादेव चित्रपटाच्या विरोधानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापाठोपाठ महिलेच्या विनयभंग प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी मोठं विधान केलं आहे.

गुन्हा सिध्द करण्यासाठी पोलिसांच्या नाकीनऊ येईल- जितेंद्र आव्हाड
X

हर हर महादेव चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी गोंधळ घातला होता. त्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयाने जामीन दिला आहे. मात्र त्यापाठोपाठ महिलेच्या विनयभंग प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली होती. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र जितेंद्र आव्हाड पोलिस ठाण्यात हजेरीसाठी आले असताना माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "पंधरा हजार रुपये कार्टात भरून जामीन मिळवावा लागतो. जामीन मिळाल्यानंतर तक्रारदाराला कोर्टात उभं केल जातं. तक्रारदार खरा आहे की खोटा? हे कोर्ट तपासून पाहतं. मी काही गुन्हाच केला नाही. मग मी सहकार्य न करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे माझ्याविरुध्द दाखल केलेला गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलिसांच्या नाकीनऊ येईल." असंही आव्हाड यांनी वक्तव्य केले.त्यामुळे आव्हाड यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करुन फिर्यादीवर कारवाई करावी, अशी मागणी महिला आयोगाने केली होती. तसेच पोलिसांनी गुन्हा कोणत्या अधारावर नोंद केला? याचा आहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मागितला आहे. परंतू पोलिसांनी अहवाल अद्यापही सादर केला नाही.

Updated : 2022-11-16T17:53:34+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top