Home > News Update > मुंबईतल्या अनेक हॉस्पिटलमधील अग्निसुरक्षेत त्रुटी, सरकारची कबुली

मुंबईतल्या अनेक हॉस्पिटलमधील अग्निसुरक्षेत त्रुटी, सरकारची कबुली

मुंबईतल्या अनेक हॉस्पिटलमधील अग्निसुरक्षेत त्रुटी, सरकारची कबुली
X

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. ९ जानेवारी रोजी झालेल्या भंडारा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांची अग्निशामक तपासणीची नेमकी काय परिस्थिती आहे. यावर विधानसभेत आमदारांनी सरकारला प्रश्न उपस्थित केला होता.

मुंबईतील रुग्णालयांमध्ये राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. तथापि बहुतांश रुग्णालयांनी अग्निशामक तपासणी केली नसून अग्नीसुरक्षा नियमांचे उल्लंघन करित असल्याचे दिनांक ११ जानेवारी २०२१ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे का? असा सवाल ADV. आशिष शेलार यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला असता, त्यावर उत्तर देताना शिंदे यांनी होय, हे खरे आहे. असं म्हणत मुंबईतील

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांची अग्निसुरक्षा तपासणी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत करण्यात येत असून, सदर तपासणी दरम्यान निदर्शनास आलेल्या अग्निसुरक्षा उपाययोजनांच्या त्रुटी व संबंधित त्रुटींची पूर्तता करण्याकरिता महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ अंतर्गत संबंधितांना नोटीस देऊन कारवाई करण्यात येत असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच मुंबईतील घटना जबाबदार कोण या संदर्भात प्रश्न उपस्थित केला.

मुंबईतील रुग्णालयांमध्ये आजतागायत घडलेल्या आगीच्या घटना या बहुतांश वेळी निकृष्ट दर्जाचे विद्युत वायरिंग, फिटिंग या कारणामुळे होत असून मॉल, कार्यालय, रुग्णालय अशा सार्वजनिक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात जात असल्याने तेथे दोन वर्षांनी अग्निसुरक्षा तपासणी होणे गरजेचे असूनसुद्धा ती होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. हे ही खरे आहे का? असा देखील सवाल विचारण्यात आला असता...

यावर उत्तर देताना शिंदे म्हणतात की, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आग लागण्याच्या कारणांचा बृहन्मुंबई महानगरपालिकेनं अभ्यास केला आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये सदोष विद्युत प्रणाली हे कारण आढळून येते.

महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ चे कलम नुसार इमारतींमध्ये बसविण्यात आलेल्या अग्निसुरक्षा यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी मालक/भोगवटादार यांची आहे. तसेच, सदर यंत्रणा सुस्थितीत असल्याबाबतची माहिती प्रपत्र ब द्वारे लायसन्सप्राप्त अभिकरणामार्फत महानगरपालिकेच्या अग्निशमन दलास प्रत्येक वर्षाच्या जानेवारी व जुलै महिन्यात सादर करणे आवश्यक आहे.

९ जानेवारी रोजी भंडारा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयातील (Bhandara District General Hospital) शिशू केअर युनिटला रात्रीच्या सुमारास अचानक आग (Fire at Sick Newborn Care Unit) लागली. या दुर्घटनेत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात आल्यानंतर पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी विधानसभेत विरोधकांनी राज्यातील रुग्णालयांची अग्निशामक तपासणी बाबत विचारणा केली.

Updated : 2 March 2021 10:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top