Home > News Update > ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाला कोरोनाची बाधा

ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाला कोरोनाची बाधा

ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाला कोरोनाची बाधा
X

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी लॉकडाऊनसाठी आठ दिवसाची मुदत दिली असताना राज्यात कोरोनाचे संक्रमन जलदगतीने होत आहे. आगामी अर्थसंकल्पीय आधिवेशनाची तयारी सुरु असताना ठाकरे सरकारमधील एका पाठोपाठ एक असे मंत्रीच कोरोना पॉझीटिव्ह होत आहे. आज सकाळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

कोरोना लाटेच्या दुसऱ्या संसर्गात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चु कडू, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे भाजपच्या खासदार रक्षा खडसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे आणि आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. महीला बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांनाही ताप चढला होता परंतू तपासणी केल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भुजबळांनी शरद पवार यांच्यासोबत लावली होती लग्नाला हजेरी लावली होती. छगन भुजबळ यांनी स्वतः दिली माहिती, संपर्कात आलेल्या लोकांनी टेस्ट करून घ्यावी असे भुजबळांनी आवाहन केलं आहे.


मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी काल सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असून राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही. नियम न पाळणारी मंगल कार्यालये, सभागृहे, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मुखपट्टी वापरा, शिस्त पाळा आणि टाळेबंदी टाळा ही त्रिसूत्री पाळा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. रुग्णसंख्या अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून कठोर निर्बंध किंवा अशंत: टाळेबंदी लागू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व शासकीय समारंभ गर्दी टाळून आणि शक्यतो दूरचित्रसंवाद माध्यमातून करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या दोन-अडीच हजारांवरून अनेक पटींनी वाढून रविवारी सात हजारांवर पोहोचली आहे. महाविकास आघाडीतील तब्बल 33 कॅबिनेट मंत्र्यांपैकी 18 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. तर 10 राज्यमंत्र्यांपैकी 7 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. म्हणजेच 43 पैकी 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील काहींनी कोरोनावर मात केली आहे तर काहीजण अजूनही कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

Updated : 22 Feb 2021 6:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top