Home > News Update > मराठा समाजासोबत आता धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक

मराठा समाजासोबत आता धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक

मराठा समाजासोबत आता धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक
X

मराठा समाजानंतर आता धनगर समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळत चालला आहे. त्यातच मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या मुद्दावरून राजकारण तापलं आहे. यातचं आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झालाय.

बीडच्या माजलगाव तालुक्यातील टाकरवन गावात बिरुबा देवाची यात्रा पार पडली. या यात्रेत समस्त धनगर समाजाने एकत्र येत आरक्षणाचा एल्गार पुकारला आहे. यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सोनार यांनी राज्य सरकारला अल्टिमेट देत विशेष अधिवेशनातून धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा समस्त धनगर समाज रस्त्यावर उतरेल असा थेट इशारा सरकारला देण्यात आला आहे.

Updated : 6 Sep 2023 10:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top