Home > Max Woman > जागतिक महिला दिनी सहकारात महिलाराज

जागतिक महिला दिनी सहकारात महिलाराज

8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यातच जागतिक महिला दिनी मावळमध्ये अनोखा महिलादिन साजरा करण्यात आला.

जागतिक महिला दिनी सहकारात महिलाराज
X

आज जागतिक महीला दिनी अटीतटीच्या निवडणुकीत मावळात पूर्णत: महिला मतदान केंद्र चालविण्यात येत आहे .विशेष म्हणजे मतदानानंतर त्याच ठिकाणी त्याच महिला मार्फत मतमोजणी होऊन तात्काळ निकाल जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या सहकाराच्या 118 वर्षाच्या इतिहासात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थे सारख्या संवेदनशील निवडणुकीचे कामकाज पूर्णतः महिला मार्फत होणे ही पहिलीच घटना आहे.

महाराष्ट्राच्या सत्तेची वाट ही सहकारातून जाते असे म्हणतात. सहकार आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सहकाराची पंढरी असलेल्या महाराष्ट्रात 54 प्रकारच्या सहकारी संस्था चालवल्या जातात. मात्र गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी हा सहकाराचा कणा समजला जातो. मर्यादित सभासद संख्येमुळे या गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका या सर्वात संवेदनशील निवडणुका आजच्या घडीला मानल्या जातात.

प्यारा गावाच्‍या आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था जशा आर्थिक विकासाचे केंद्र आहेत तसेच गावपातळीवरील राजकीय चढाओढ आणि कुरघोडीचेही केंद्र ठरतात. त्यातूनच या संस्थांच्या निवडणुकांची संवेदनशीलता वाढते. प्यारा सन 1904 साली ब्रिटिशांनी सहकार विषयक पहिला कायदा केला .त्या कायद्यान्वये महाराष्ट्रात आणि भारतामध्ये गाव पातळीवरील गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांची स्थापना करण्यात आली .आजमितीस महाराष्ट्रात 21000 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत .कोरोणाचे पार्श्वभूमीवर या संस्थांच्या निवडणुका मागील जवळपास दोन वर्ष थांबलेल्या होत्या. या संस्थांच्या निवडणुका आता चालू झाले असून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. यारा महाराष्ट्रामध्ये सहकारी सोसायट्यांच्या रणधुमाळी यांमुळे ग्रामीण भागाचे राजकारण जरी ढवळून निघत असला तरी पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यांमध्ये एक अनोखा प्रयोग आज होत आहे .

आजच्या जागतिक महिला दिनी पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात धामने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक होत आहे. सदरची निवडणूक ही नेहमीच्या निवडणुकीपेक्षा वेगळे आहे .या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील श्रीमती वंदना तळपे आहेत तर मतदान केंद्रावरील सर्व स्टाफ सुद्धा महिला कर्मचाऱ्यांचा आहे .विशेष म्हणजे या गावातील सरपंच आणि पोलीस पाटील या दोन्ही पदावर महिलाच आहेत.

प्यारा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी यापूर्वी काही ठिकाणी महिला मतदान केंद्राचा प्रयोग झालेला आहे .मात्र सहकारी संस्थांच्या निवडणुका तील संवेदनशीलता असल्यामुळे सहकाराच्या 118 वर्षाच्या इतिहासात महिलांनी चालवलेले एकही मतदान केंद्राचा प्रयोग आजपर्यंत महाराष्ट्रात होऊ शकलेला नाही .मावळ तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था विठ्ठल सूर्यवंशी यांनी विचारपूर्वक जागतिक महिला दिनी राज्यातील पहिले अभिनव महिला मतदान केंद्र मावळ तालुक्यात धामणे या गावी करण्याचे निश्चित केले आहे .त्याप्रमाणे आज रोजी सदरची अटीतटीची निवडणूक होत आहे .

यारा मावळची भूमी ही परिवर्तनाची आणि प्रबोधनाची भूमी आहे .ज्ञानोबा तुकोबांना अभंग वाणी याच ठिकाणी स्फुरली. छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याचे तोरण मावळा मध्येच बांधलेले आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांचं आवडतं ठिकाण तळेगाव दाभाडे मावळ मध्येच आहे .अशा मावळ तालुक्यात राज्यातील सहकाराच्या इतिहासातील पहिले महिला मतदान केंद्र विचारपूर्वक जागतिक महिला दिनी मावळ तालुक्यात आम्ही निश्चित केलेले आहे .जिजाऊंच्या लेकिन वर विश्वास ठेवून संवेदनशील अशा निवडणुकीत आम्ही सहकारातील पहिले धाडस करत आहोत . माझा विश्वास निश्चितच सार्थ ठरेल असे विठ्ठल सूर्यवंशी सहायक निबंधक, सहकारी संस्था ,मावळ जिल्हा पुणे यांनी सांगितले.

Updated : 8 March 2022 4:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top