Home > Max Woman > धमकीमागे सत्ताधाऱ्यांचा हात - आ. यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप

धमकीमागे सत्ताधाऱ्यांचा हात - आ. यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप

धमकीमागे सत्ताधाऱ्यांचा हात - आ. यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
X

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना काल ई-मेल द्वारे जीवे मारण्याची धमकी आली होती. यानंतर आता संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका मांडणाऱ्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना देखील जीवे मारण्याची धमकी ट्विटर द्वारे देण्यात आली आहे.

यावर आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की धमकी देणाऱ्यानी सांगितले आहे की तुमची गत दाभोळकरांसारखी करू त्यांचे हाल आम्ही जशे केले तशेच तुमचे करु" त्यांना ही धमकी ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यानंतर बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की आम्हाला मारुन टाकायचं असंल तर मारुन टाका परंतु आम्ही पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. यामागे सत्ताधाऱ्यांचा हात असल्याचा आरोप आ. ठाकूर यांनी केला असुन, माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर, त्याला गृहखातं जबाबदार असल्याचं आ.ठाकूर म्हणाल्या.


Updated : 31 July 2023 9:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top