Home > Max Woman > मोदींचे नाव जनतेच्या मनातून कसे पुसू शकाल? रक्षा खडसेंचा नणंद रोहिणी खडसेंवर पलटवार...

मोदींचे नाव जनतेच्या मनातून कसे पुसू शकाल? रक्षा खडसेंचा नणंद रोहिणी खडसेंवर पलटवार...

मोदींचे नाव जनतेच्या मनातून कसे पुसू शकाल? रक्षा खडसेंचा नणंद रोहिणी खडसेंवर पलटवार...
X

बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा अजित पवार या नणंद भाऊजाई या एकाच कुटुंबाचा वाद चांगलाच रंगला आहे. तसाच वाद जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातील एकनाथ खडसे कुटुंबात ही रंगायला सुरवात झाली आहे. खडसें च्या सून रक्षा खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांच्यात वाद सुरु झाला आहे. भाजप च्या खासदार रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार ) गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या नणंद-भाऊजाई यांच्यातील सोशल मीडियातून एकमेकांवर वार-पलटवाराला सुरवात झाली आहे.

खडसे नंदन-भाऊजाई यांच्यात पडली अशी ठिणगी -

निवडणुका जाहीर झाल्यानंतरही भाजपचे अनेक ठिकाणी कमळ चिन्ह भिंतीवर दिसून येत आहे. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघ क्षेत्रात असं चित्र असल्याचा दावा करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशअध्यक्ष रोहिणी खडसे यांनी X या शोशल मीडियात पोस्ट टाकलीय त्यात रोहिणी खडसे लिहितात

'भाजपाने गावोंगाव व शहरातही सर्वदूर कमळ चिन्हाच्या भिंती रंगविल्या आहेत. त्यातील काही सार्वजनिक जागेवर, शासकीय कार्यालयांच्या भिंतींवर, मंदिरांच्या भिंतींवर रंगविलेल्या दिसतात. आता आचारसंहिता जाहीर झाली आहे, तेव्हा माझी सर्व प्रशासनास विनंती आहे की, सार्वजनिक, खाजगी अथवा मंदिरांच्या जागेवरील या रंगविलेल्या भिंती त्यांना पुसायला लावा अथवा सरकारने पुसाव्या. अन्यथा आचारसंहिता भंगाबद्दल न्यायालयात दाद मागावी लागेल'

रोहिणी खडसेंनी आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचा इशारा दिला आहे.

रोहिणी खडसेंच्या या पोस्ट ला भाजप खासदार रक्षा खडसे यांनी X आणि फेसबुक या सोशल मीडियावर जोरदार पलटवार केला आहे.

मोदींचे नावं भिंतीवरून पुसू शकाल..

मोदींचे नावं

खातांच्या बॅग वरून काढू शकाल..

मोदींचे नावं म्हणून विरोध करू शकाल...

पण मोदींचे नावं

जनतेच्या मनातून कसे काढू शकाल...

येणार तर मोदीच....

असं उत्तर आपल्या भाऊजाई ला म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंना रक्षा खडसे यांनी दिलं आहे..

एकंदर भाजप वर टीका केली तर सहन केली जाणार नाही, असा ईशाराच कायम संयमाची भूमिका घेणाऱ्या रक्षा खडसेंनी दिला आहे.

रक्षा खडसे ह्या संयमी आणि कोणावरही थेट टीका करण्याच टाळतात. मात्र पहिल्यांदाच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तेही आपल्याच कुटुंबातील सदस्याला उत्तर दिलं आहे.

पक्ष सोडल्यानंतर भाजपवर सडकून टीका करण्याऱ्या एकनाथ खडसे यांच्यावर वेळ पडली तर टिकेला उत्तर देण्याची तयारी आता रक्षा खडसेंना करावी लागणार आहे.




खडसेंच्या एकाच कुटुंबात भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट पक्ष असल्याने आता ही लढाई या दोघा पक्षाची राहिली नसून रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे या दोघा नणंद-भाऊजाई अशी आमणे सामने रंगली आहे. ही तर सुरवात आहे अजून बरच वाकयुद्ध रंगणार असं चित्र आहे.



Updated : 21 March 2024 6:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top