Home > Max Woman > Actress "Yami Gautam" गरोदरपणात वाचतेय रामायण...!

Actress "Yami Gautam" गरोदरपणात वाचतेय रामायण...!

Actress Yami Gautam गरोदरपणात वाचतेय रामायण...!
X

अलिकडच्या काळातील महिला आपल्या गरोदरपणात मोबाईल आणि इंटरनेटचा सर्रास वापर करताना आपण बघतोय आणि त्यात आश्चर्य असं काही नाही, पण बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम हिने मात्र या गोष्टीला बगल देत आजच्या गर्भवती महिलांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे, ती सध्या गर्भधारणेच्या अंतिम टप्प्यात असून मे महिन्यात ती आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. जन्माला येणाऱ्या या बाळावर चांगले धार्मिक संस्कार व्हावेत यासाठी ती सध्या रामायण कथा वाचत आहे.

यासंदर्भात बोलताना यामी म्हणाली की, 'आम्ही पारंपरिक कुटुंबातील आहोत. इथे बाळाची पाळणाघरे बनवण्याचा ट्रेंड नाही. अर्थात, बाळासाठी घरात काही तडजोडी कराव्या लागतील, पण बाळ जेव्हा मोठे होईल आणि घरात उड्या मारायला लागेल, तेव्हा आपण त्यानुसार घराचे नूतनीकरण करून घेऊ. माझ्या बहिणीने, जी स्वतः एका मुलाची आई आहे, तिने मला सांगितले की, हा जीवनाचा सर्वोत्तम टप्पा आहे. काही आव्हाने नक्कीच आहेत, पण जेव्हा आपण पालक बनू तेव्हा आपण सर्वकाही शिकू. आम्ही सर्व खूप आनंदी आहोत, असं यामी म्हणाली.

यामीने फेब्रुवारीमध्ये गोड बातमी दिली होती

यामी गौतम आणि तिचा पती चित्रपट निर्माते आदित्य धर यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये 'आर्टिकल 370' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये गरोदरपणाची माहिती दिली होती. हा चित्रपट कौटुंबिक आहे. चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान आम्हाला ही आनंदाची बातमी मिळाली असल्याचे आदित्य धर यांनी सांगितले

Updated : 18 April 2024 1:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top