Home > MAX_BULLETIN > डोकं सुन्न करणारे मॅक्स महाराष्ट्रचे ग्राऊंड रिपोर्ट बुलेटीन

डोकं सुन्न करणारे मॅक्स महाराष्ट्रचे ग्राऊंड रिपोर्ट बुलेटीन

स्वातंत्र्यानंतरही मसणवट्यातील जगणं वाट्याला आलेल्या मसनजोगी समाजाचे धगधगते प्रश्न, पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रध्देमुळे मांत्रिकाने केलेल्या मारहाणीत चिमुकल्याचा झालेला मृत्यू ते आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेची बळी ठरलेली पालघरमधील चिमुकली याबरोबरच कुस्तीपटूंचे न्यायासाठी सुरु असलेले आंदोलन यांचा वेध घेणारे मॅक्स महाराष्ट्रचे स्पेशल बुलेटीन...

डोकं सुन्न करणारे मॅक्स महाराष्ट्रचे ग्राऊंड रिपोर्ट बुलेटीन
X

मसनजोगी समाजाचे मसनवाट्याचे जिणे सरणार तर कधी ? | #MaxMaharashtra

मसनजोगी समाज मसनवट्याच्या कडेला घातलेल्या फाटक्या झोपडीत वर्षानुवर्षे हलाखीचे आयुष्य जगत आहे. मसनजोगी समूहाच्या समस्या मांडणारा मॅक्स महाराष्ट्रचा विशेष ग्राउंड रिपोर्ट...

शरद आंबा काबीज करणार अवघ्या देशाच मार्केट | #MaxMaharashtra

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने अडीज किलो वजन असलेल्या आंब्याची प्रजात विकसित केली आहे. आंब्याच्या या प्रजातीचे नामकरण त्यांनी शरद आंबा असे केले आहे. भविष्यात हा शरद आंबा देशभरातील मार्केटमध्ये भाव खाणार का ? काय आहेत या आंब्याची वैशिष्ट्ये पहा अशोक कांबळे यांच्या या रिपोर्टमध्ये…

मांत्रिकाच्या मारहाणीत चिमुकल्याचा मृत्यू, अनिसच्या पुढाकारामुळे गुन्हा दाखल | #MaxMaharashtra

अंधश्रद्धेतून एका चौदा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सांगली जिल्ह्यामध्ये घडली आहे. काय आहे हा प्रकार पहा या रिपोर्टमध्ये..

आरोग्य व्यवस्थेच्या विषारी डंखामुळे आदिवासी छायाचा मृत्यू | #MaxMaharashtra

पालघर जिल्हयात चीड आणणारी संतापजनक घटना घडली आहे. सरकारी रुग्णालयात सर्पदंश झालेल्या मुलीला उपचार न करताच घरी पाठवल्याने तिचा मृत्यु झाला आहे. काय आहे हा संतापजनक प्रकार पहा रविंद्र साळवे यांच्या या रिपोर्टमध्ये…

नोटा बदलण्यासाठी नागरिकांची ससेहोलपट, कागदपत्र द्या, फॉर्म भरा म्हणत नागरिकांची कोंडी | #MaxMaharashtra

नोटा बदलण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. पण सामान्य नागरिकांना बँकांमध्ये नोटा बदलून घेतांना नेमक्या काय अडचणी येतात? याचाच आढावा घेतला आहे मॅक्स महाराष्ट्रच्या प्रतिनिधी शिवानी पाटणे यांनी...

न्यायासाठी ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंचा आक्रोश, सरकारचा मात्र कानावर हात | #MaxMaharashtra

ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी ब्रिज भुषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत धरणे आंदोलन केले आहे. या आंदोलनाला महिना पूर्ण झाल्यानंतरही सरकारने अजूनही या कुस्तीपटूंची दखल घेतली नसल्याचे समोर आले आहे. पण महिनाभरात नेमकं काय घडलं? याचा वेध घेऊयात भरत मोहळकर यांच्या स्पेशल रिपोर्टमधून...

2 हजार देतात आणि 200 रुपयाचे पेट्रोल टाकतात, नोटबंदीनंतर पेट्रोल पंप चालकांची कोंडी| #MaxMaharashtra

दोन हजार रुपयाची नोट बंद झाल्यानंतर नागरिकांनी आपल्याकडील नोटा बँकेमध्ये जमा न करता पेट्रोल भरण्यासाठी वापरायला सुरुवात केली. मात्र पेट्रोल पंप चालकांना नेमका कसा अनुभव येतो? याचाच वेध घेऊयात मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अतुल गोडसे यांच्या रिपोर्टमधून...

Updated : 24 May 2023 7:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top