News Update

बाईच मरण...

बाईच मरण...
X

बाई हि कधीही स्वत:ला जगतच नाही कधी ती आई, बहीण, मामी, काकु, आत्या या पलिकडे ती आहे हे फारस कोणालाही उमगतच नाही. कुठले ना कुठले ओझे ती सतत वाहवत असते. कधी नात्याचे तर कधी घरचे... तीच्या कर्तृत्वाची पण दखल घ्यावी अस फारच क्वचित होते. तुम्हाला वाटेल हे फक्त गल्ली-बोळ्यात राहणा-या महिलांच होत असेल पण हे अगदी खोट आणि हे सिद्ध करणारी घटना अजुनही आपल्या आजूबाजूला घडते आहे. श्रीदेवीच्या मृत्युची बातमी आली आणि सगळा देश हळहळला, पण फार नाही. ती शेवटी एक बाईच तिच्या जाण्यानंतर खरतर तिच्या अभिनयाची चर्चा व्हायला हवी होती मात्र त्याची दखल कोणाला फारशी घ्यावीशी वाटली नाही. चर्चा काय सुरु झाली तर तिने सुंदर दिसण्यासाठी काय काय केले यावर? हे फारच कमी होते की काय म्हणून मीडिया तिच्या बाथरुम पर्यंत पोहोचला आणि काय झाले असेल यावर चर्चा सुरु झाल्या.

एका बाईच्या दिसण्याला जातीचा वर्गाचा रंग असतो. तिने कस दिसावा हे खूपच कमी वेळा ठरवू शकते. त्यातही कस दिसावा हा तिचा चाॅईस आहे हे एक माणूस म्हणून समजायला आमची व्यवस्था कमकुवतच ठरली हे पुन्हा एकदा जाणवले. काही वर्षापूर्वी burn my body ही Documentry स्वरुप फिल्म आली होती. त्यात महिलांच्या शवघरातील धडासोबत लैंगिक अत्याचार करणा-या पुरुषाची कहाणी जी सत्य आहे ती दाखवली गेली होती. ते पाहुन मुली सांगत होत्या की मेल्यानंतरही माझं शरीर जाळून टाका ते ठेवू नका कारण असे की, अत्याचार आम्ही मेल्यावरही होऊ शकतात. माणूस म्हणून जगू काय मरुही देत नाहीत बायकांना... हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मेल्यानंतरही तिच शरीर हेच चर्चीलं जातय. बायकांना सुखाने मरुही न देणा-या संवेदनशील समाजाचे आपण भाग आहोत, मात्र याला आता जबाबदार म्हणून कोणाला धरणार? सरकार? धोरण? कि मर्दाड समाज?

Updated : 27 Feb 2018 3:39 PM GMT
Next Story
Share it
Top