Home > मॅक्स वूमन > वटपौर्णिमा न 'ती'

वटपौर्णिमा न 'ती'

वटपौर्णिमा न ती
X

रोज सकाळी उठून घरातील सगळं आवरून डब्बे तयार करणारी ती आज एकच डब्बा तयार करते... तेव्हा नवरा विचारतो का ग आज एकच? त्यावेळी तिच्या तोंडातून शब्द पडतात आज वटपौर्णिमा आहे ना तर उपवास... खरं तर मला विशेष वाटतं एकविसाव्या शतकात बिनधास्तपणे वावरणाऱ्या, स्वतःला मॉडर्न म्हणून घेणाऱ्या... अगदी राहणीमानात बदलेल्या जीन्स-टॉप घालणाऱ्या, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करणाऱ्या स्रिया देखील अगदी वटपौर्णिमेचा काहीही न खाता उपवास करून वडाला फेरे मारताना दिसतात. राहणीमानाने मॉडर्न झालेल्या आम्ही खरंच विचाराने प्रगल्भ झाले आहोत का?

कित्येक पुरुष असेही आहेत की ते रोज दारू पिऊन बायकोशी भांडतात, तिला मारझोड करतात तरीदेखील तिचा हा हट्टहास का असावा की सात जन्म तोच पती मिळावा? कित्येक पुरुषमंडळी अशीही आहेत आपल्या बायकोचा सांभाळही करत नाही तरीदेखील ती अबला नारी पुढच्या जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाला फेऱ्या मारतांना दिसतेय? किती अंधश्रद्धा ना!! अजूनही न उलगडलेलं कोडं म्हणजे सात जन्म तोच पती मिळावा म्हणून नेहमी स्रियांनीच का वडाला फेरे मारायचे? तिनेच का व्रत करायचं? कधी कुठल्या पुरुषाने वडाच्या झाडाला फेरे मारले आहेत का की, हीच बायको सात जन्मी मिळावी म्हणून?

Updated : 27 Jun 2018 10:37 AM GMT
Next Story
Share it
Top