Home > मॅक्स वूमन > महिला जिल्हाधिकारी जेव्हा रात्री अचानक घरात शिरतात…

महिला जिल्हाधिकारी जेव्हा रात्री अचानक घरात शिरतात…

महिला जिल्हाधिकारी जेव्हा रात्री अचानक घरात शिरतात…
X

फेजाबाद येथील जिल्हाधिकारी किंजल सिंह जेव्हा एका भाजी मंडईत जातात. तेव्हा एका वृद्ध महिलेला पाहून त्या तिच्याकड़ील एक किलो कारली विकत घेतात. मात्र त्याबदल्यात त्या वृद्ध महिलेला ती दिवसभरात जितके पैसे कमवते तेवढी रक्कम तिला देतात. कारली घेता घेता त्या महिलेची आस्थेनं विचारपूस करुन कामावर परतात.

दरम्यान जेव्हा वृद्ध महिला घरी येते तेव्हा ती आपल्या नातीला सर्व माहिती सांगते. मंडईत काम करणारी ती वृद्ध महिला जेव्हा रात्रीचा स्वयंपाक बनवण्यात गर्क असते तेव्हा अचानक अनेक गाड्या तिच्या घरासमोर येऊन उभ्या राहतात. आणि त्यातून उतरतात जिल्हाधिकारी किंजल. महिलेची चौकशी करत असतानाच त्या घराची झालेली अवस्था बघतात. घरात गॅस नसून किराणा सामानाचीही घरात चणचण असल्याचे त्यांच्या लक्षत येताच, त्या त्वरित घरातील खाण्यासाठी आवश्यक असलेल्या सामानाची पुर्तता करण्याचे आदेश देतात. व त्याचे पालनही रात्र झालेली असतानाही केले जाते. उज्वला गॅस योजनेतून लवकरात लवकर गॅस उपलब्ध करण्याचे आश्वासन देत त्या निघतात. मात्र सर्व सामान्य जनतेला आपल्या ऑफिसच्या बाहेर ताटकळत ठेवणारे अधिकारी आणि सर्वसामान्यांना सरकारच्या योजनांचा लाभ व्हावा म्हणून काम करणाऱ्या कर्तव्य दक्ष किंजल सिंह.

आज किंजल सिंह यांचे समाजात कौतुक केले जातं आहे. पण त्या व्यस्त आहेत अजून एका गरजूवंताला मदत करण्यामध्ये…

Updated : 21 Jun 2018 11:49 AM GMT
Next Story
Share it
Top