Top
Home > मॅक्स वूमन > डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन व्हायचंय - कविता देवी

डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन व्हायचंय - कविता देवी

डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन व्हायचंय - कविता देवी
X

दक्षिण आशियाई गेम्समध्ये वेटलिफ्टिंग या खेळात 2016 साली सुवर्ण पदक जिंकलेली हरयाणाची खेळाडू कविता देवी हिने व्यावसायिक कुस्तीपटू म्हणून पुढे कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. अव्वल स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणार्‍या या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक स्तरावरील स्पर्धेत तिने चॅम्पियन होण्याचा निर्णय घेतला आहे. डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये एण्ट्री मारणारी कविता देवी हि पहिलीच हिंदुस्थानी महिला ठरणार आहे.

दैनिक सामनाशी संवाद साधताना तिने सांगितले की, कुस्तीच्या रिंगणात क्रोध व्यक्त करता येतो. त्यामुळे मी रेसरल झाली,‘द ग्रेट खली’ यांच्या ऍकॅडमीद्वारे खेळाडूंची निवड केली जाते. त्यानंतर त्यांना रीतसर ट्रेनिंग देऊन अमेरिकेतील डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये प्रवेश दिला जातो. मलाही तेथूनच संधी मिळाली. डब्ल्यूडब्ल्यूईसोबत तीन वर्षांचा करार करण्यात आलाय. यामुळे आर्थिक प्रश्न सुटलाय. माझे कुटुंब कर्जमुक्त झाले असे ती म्हणाली.

Updated : 23 Dec 2018 11:15 AM GMT
Next Story
Share it
Top