अनाथ मुलीचा नामकरण समारंभ कामा हॉस्पिटलमध्ये
Max Maharashtra | 3 Aug 2018 5:31 PM IST
X
X
महिलांकरीता प्रसिध्द असलेले कामा व अाल्ब्लेस हॉस्पिटलमध्ये गुरुवारी प्रथमच एका दीड महिन्याच्या अनाथ मुलीच्या नामकरणाचा समारंभ आनंदात साजरा करण्यात आला. कामा आणि अाल्ब्लेस हॉस्पिटलच्या अधिक्षीका डॉ. राजश्री कटके यांनी या मुलीचे नाव अहिल्या हे ठेवले. चर्चगेट रेल्वे स्थानकात अपंगाच्या डब्यात ती आजारी अवस्थेत सापडली आणि रेल्वे पोलिसांनी कामा हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिचे प्राण वाचवले.
अनाथ मुलीची प्रकृती चिंताजनक होती दीड महिन्यानंतर डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने तिला जीवनदान मिळाले. हॉस्पिटलने तिचे नामकरण करण्याची इच्छा दाखवली. या मुलीचे नाव अहिल्या हे ठेवण्यात आले. या वेळी कामा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिक्षीका राजश्री कटके, हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी व रेल्वे पोलिस उपस्थित होते.
Updated : 3 Aug 2018 5:31 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire