Home > मॅक्स वूमन > खा. सुप्रिया सुळे यांचा जीवनप्रवास...

खा. सुप्रिया सुळे यांचा जीवनप्रवास...

खा. सुप्रिया सुळे यांचा जीवनप्रवास...
X

सुप्रिया सुळे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि देशातले महत्वाचे नेते शरद पवार यांच्या कन्या. सध्या खासदार म्हणून त्यांची कारकिर्द त्या गाजवत आहेत. नुकताच त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कारही मिळाला. मात्र, राजकराणात येण्याआधी सुप्रिया सुळे यांचे जीवन कसे होते, त्यांचं बालपण कसं गेलं, याबद्दल जाणून घेऊ.

सुप्रियाताईंचं बालपण…

शरद पवार यांचे प्रतिभाताईंशी लग्न ठरले त्यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीला एकच अट घातली होती. ती म्हणजे आपल्याला एकच अपत्य असेल. मग ते मुलगा असो वा मुलगी. त्यानंतर ३० जून १९६९ रोजी पुण्यात सुप्रियाताईंचा जन्म झाला. त्या शरद पवार यांच्या एकुलत्या एक कन्या. त्याकाळात समाज एवढा पुढारलेला विचारांचा नसताना शरद पवार व त्यांच्या पत्नीने हा निर्णय घेतला त्यावरुन नक्कीच त्यांचे आधुनिक विचार अधोरेखित होतात.

अशा आधुनिक विचार करणाऱ्या कुटूंबात सु्प्रियाताईंचे बालपण गेले. मुलगा-मुलगी असा कोणताही भेद न करता त्यांची जडणघडण झाली. शरद पवार राज्याचे मुख्‍यमंत्री असतानाही सुप्रियाताई एस. टी. बसने कॉलेजात ये-जा करत असत. त्यांनी एका अग्रगण्य दैनिकात काही काळ नोकरी केली. त्यांच्या बालपणात त्यांच्यावर कोणत्याही गोष्टीसाठी सक्ती केली गेली नाही. त्यांना स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. शिक्षणासोबतच त्यांच्या लग्नाबाबत, त्यांच्या आयुष्यातील सगळेच निर्णय सुप्रिया सुळे यांनी स्वत: घेतले आणि यामध्ये विशेष बाब म्हणजे त्यांचे आई-वडील व कुटुंबीय त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहीले.

राजकीय प्रवास….

शरद पवार हे राज्यातले सर्वात प्रभावशाली राजकीय नेते आहेत. अशा प्रभावशाली राजकरण्याच्या घरी जन्माला आल्याने राजकरणाचे बाळकडू घरुनच मिळाले. कित्येक राजकीय खेळ्या त्यांनी जवळून पाहील्या आणि त्यातूनच त्यांना राजकीय शिक्षण मिळत गेलं. सुरवातीच्या काळात त्यांनी राजकरणात जास्त सहभाग केला नाही. त्यांना सामाजिक कामांत जास्त रस होता.

याच दरम्यान सुप्रिया सुळे राजकरणात येतील अशी चर्चाही नसतांना २००६ मध्ये त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले. त्यानंतर सु्प्रिया सुळे यांच्या राजकीय प्रवेशाची नवी चर्चा सुरु झाली. त्यांनी त्यांच्या खासदारकीच्या काळात राजकरणात रस घ्यायला सुरुवात केली. त्या अनेक सामाजिक व राजकीय व्यासपीठांवर दिसू लागल्या.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे शरद पवारांच्या बारामती मतदारसंघातून निवडणुकीला उभा राहल्या आणि त्यांनी मोठा विजय मिळवला. तिथून त्यांचा राजकीय प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला. महिला सक्षमीकरण हा सु्प्रिया सुळे यांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वालंबन देण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधातही त्यांनी जनजागरण मोहिम सुरु केली.

सुप्रियाताईंनी ‘जागर’ हा कार्यक्रम हाती घेतला. ‘जागर’ चा हा संदेश गाव- शहरांपर्यंत पोचवण्यासाठी पदयात्रा व प्रभातफेर्‍यांचे आयोजन केले. कुपोषणाबाबतही सुप्रिया सुळेंनी भरीव काम केलं. असे सामाजिक विषय हाताळत त्या लोकापर्यंत पोहचत आहेत.

संसदेतही त्यांची कामगिरी लक्षणिय आहे. फेम इंडिया संस्थेच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट संसदपटू या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. संसदेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत.

Updated : 22 Jun 2018 12:55 PM GMT
Next Story
Share it
Top