'चर्चा करायचीच असेल तर तिच्या अभिनयाची करावी'
Max Maharashtra | 27 Feb 2018 9:54 PM IST
X
X
अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. आपलं आयुष्य हे आपलं असत. ते कसं जगायच हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. एखाद्या चांगली वाटणारी गोष्ट हि दुस-याला वाईट वाटू शकते. श्रीदेवी गेल्यानंतर सिनेक्षेत्रासह देशालाच दुःखाचा हादरा बसला असताना, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ज्या काही चर्चा चालू आहेत, त्या खूपच त्रासदायक आहे. चर्चा करायचीच असेल तर तिच्या अभिनयाची करावी, ते न करता तिच दिसण-हसन, राहणीमान आणि इतर सर्व वैयक्तिक म्हटल्या जातील अश्या बाबींमध्ये चर्चेला उधाण आलेले आहे. श्रीदेवीच अस अकाली जाणं हे तिच्या कुटूंबाबरोबरच, चित्रपटसृष्टीला ही मोठा धक्का आहे. पब्लिक फिगर असलेल्या लोकांनाही आयुष्य असत हे आपण अश्या वेळी का? विसरतो. हि लोक काय खातात कशी राहतात? यावर जणू काही ती पब्लिक प्रॉपर्टी असल्यासारखेच बोले जाते. कुठल्याही माणसाने कसं दिसावे हि त्याची अतिशय वैयक्तिक बाब आहे, त्यासाठी होणारा त्रास तसेच काही नुकसान सहन करण्याची तयारी असेल तर इतर व्यक्तींनी त्यात दखल देत सल्ले देण्यात काय मुद्दा आहे आणि खास करून ती व्यक्तिच जर जगात नाही तर तिच्या नंतर अशी टिका करने हे खरतर अमानवीयच आहे. तिच्या कुटुंबाला हा आघात सहन करण्याची ताकद आपण खरतर द्यायला हवी मात्र त्याच वेळेस कुटूंबाला नवीन आघात आपण देतो आहोत ही समज आपल्यात कधी येणार आहे?
स्मिता जयकर, अभिनेत्री
Updated : 27 Feb 2018 9:54 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire