Home > Election 2020 > साध्वींच्या आजारपणाचे नाटक…

साध्वींच्या आजारपणाचे नाटक…

साध्वींच्या आजारपणाचे नाटक…
X

पत्रकार म्हणून काम करताना बरेवाईट असे वेगवेगळे अनुभव येत असतात. २०११ साली आलेल्या अशाच एका अनुभवाबाबत आपल्याला सांगावेसे वाटते. एके दिवशी मला एका पुरूषाचा फोन आला की मी जेजेमधून साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचा केअर टेकर बोलतोय़. साध्वींना तुम्हाला भेटायचे आहे. मी म्हटले नक्कीच भेटेन.

साध्वीला मला भेटायचे होते कारण मी एकटीच पत्रकार अशी होते की जी तिच्याविरोधात सतत लिहित होते. साध्वी आजारी असल्याचे नाटक करीत आहे. तसेच आरोपी असूनही तिचे नखरे आणि मागण्या इतक्या असाय़च्या की बेडशीट नवे द्या, टेबल पंखा द्या आणि अनेक. त्यामुळे मी तिच्याविरोधात का लिहिते आहे हे जाणून घेण्यासाठी तिला मला भेटायचे होते हे माझ्या लक्षात आले होते. पण तिच्याशी सर्वांच्या समोर कशा गप्पा माऱणार कारण तिच्या पहा-याला अनेक पोलीस असतील, पोलीस मला भेटू देतील का असा विचार करीत मी जेजेमध्ये पोहोचले. पण पाहते तर काय पोलीसांनी मलाच काय माझा फोटोग्राफर सचिन रमेश हरळकर यालाही सोडले.

तिला भेटताच तिने पहिला प्रश्न मला विचारला हिंदू आहेस मी म्हणाले हो, मग ती म्हणाली ब्राम्हण आहेस मी म्हणाले हो. मग माझ्या विरोधात का सारखे लिहिते आहेस. माझ्याविरोधात षडयंत्र रचले जाते आहे. मग मी म्हणाले पण मॅडम तुमच्या तपासण्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. तुम्हाला कोणताही मोठा आजार नाही. तुम्ही तंदुरस्त आहात मग डिस्चार्ज का घेत नाही. तर प्रज्ञा सिंह म्हणाली की हे सर्व षडयंत्र आहे, मी तर जागेवरून उठू सुद्दा शकत नाही. मग मी म्हणाले पण मॅडम तुम्हाला बिछान्यात पडून त्वचेवरही काही परिणाम झालेला दिसत नाही. तर ती म्हणाली कारण माझे केअर टेकर माझी काळजी घेतात. तुला अजूनही लक्षात येत नाही का माझ्यावर अत्याचार केला जात आहे. मी म्हटले ठीक आहे मॅडम मी तुमचा मुद्दा मांडते माझ्या सहका-याने फोटो घेतले मग आम्ही निघालो.

जेजे मध्ये प्रज्ञा सिंहला डॉ एस एस राजपूत यांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. या डॉक्टरांनी आता दावा केला आहे की गेल्यावर्षी लखनौच्या राम मनोहर लोहिया मेडिकल इन्स्टिट्युटमध्ये त्यांनी शस्त्रक्रिया करून प्रज्ञाचे दोन्ही स्तन काढून टाकले आहेत. कारण तिला स्तनाच्या कर्करोगाचा धोका होता. मी चुकत नसेल तर डॉ राजपूत यांचीसुद्धा चौकशी सुरू आहे, प्रज्ञा गेल्यानंतर त्यांनी अचानक जेजे हॉस्पीटल सोडले आणि त्याच डॉक्टरने प्रज्ञावर कशी काय शस्त्रक्रिया कशी काय केली. जगात अन्य तज्ञ डॉक्टर नाहीत का बरं तिला कर्करोगाचा धोका होता तर तिने देशात प्रसिद्ध असलेल्या टाटा रूग्णालयाकडे का धाव घेतली नाही. शस्त्रक्रियेसाठी लखनौ का निवडले? आणि ती दावा करते आहे की गोमुत्र आणि अन्य गोपदार्थांचे मिश्रण करून तीने कर्करोगावर मात केली. तिच्यावर शस्त्रक्रिया कऱणा-या जेजेतील त्याच डॉ राजपूत यांना तिने का श्रेय दिले नाही. ज्यांनी जेजे पासून लखनौपर्यंत तिची साथ दिली आहे. असे अनेक प्रश्न निर्माण होताहेत पण सवाल हा आहे की या प्रश्नांची उत्तरे कोण देणार ?

Updated : 27 April 2019 9:05 AM GMT
Next Story
Share it
Top