News Update
Home > Election 2020 > प्रियांका शिवसेनेत सामील

प्रियांका शिवसेनेत सामील

प्रियांका शिवसेनेत सामील
X

काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी माझ्याशी गैरवर्तणूक केली, परंतु पक्षानं दखल घेतली नसल्याचा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि मीडिया सेलच्या समन्वयक प्रियांका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी काँग्रेसचा राजीनामा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

काय म्हणाल्या प्रियांका चतुर्वेदी ?

लोकसभा निवडणुकीत मला तिकीट मिळेल अशी आशा होती, पण तिकीट न दिल्याने मी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असे म्हणणे योग्य ठरणार नाही.

मी विचार केल्यानंतरच शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचा प्रचार करणार.

पक्षाची सेवा करताना मला, माझ्या कुटुंबियांना व मुलांना किती धमक्या आल्या, किती शिवीगाळ झाली, याची तुम्हाला आठवण करून द्यायला नकोच. माझ्या आकांक्षाना काँग्रेस पक्ष योग्य वाव देईल या अपेक्षेमुळे मी कधीही काही मागितलं नाही. मला खेद वाटतो की, काँग्रेस पक्ष महिलांची सुरक्षा, सन्मान व सबलीकरणाला प्राधान्य देतो, परंतु ते कृतीत मात्र दिसलं नाही.

शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी ट्विटरच्या माध्यमातून चतुर्वेदींनी काँग्रेसचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. काँग्रेसच्या मीडियाच्या सगळ्या व्हॉट्स अॅप ग्रुपमधून प्रियांका चतुर्वेदी बाहेर पडल्या असून, त्यांनी त्यांच्या ट्विटरवरील काँग्रेसचे पददेखील हटवले आहे. प्रियांका चतुर्वेदींनी काँग्रेसच्या नेत्यांकडे राजीनामा सोपवला आहे.

Updated : 19 April 2019 11:55 AM GMT
Next Story
Share it
Top