Home > मॅक्स वूमन > ज्यांना रुमणं, खुरपणं कळत नाही अशी माणसं कृषीमंत्री होतात - सुषमा अंधारे

ज्यांना रुमणं, खुरपणं कळत नाही अशी माणसं कृषीमंत्री होतात - सुषमा अंधारे

ज्यांना रुमणं, खुरपणं कळत नाही अशी माणसं  कृषीमंत्री होतात - सुषमा अंधारे
X

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत ठाकरे गट १३ पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी राज्यसरकारमधील अनेक नेत्यांवर टीकासुध्दा केली आहे. त्या म्हणाल्या की, ज्यांनी रुमणं, कुळवं, दांडा, खुरपणं, माहिती नाही, अशी माणसं कृषीमंत्री होतात. याशिवाय नवनीत राणांबद्दल बोलताना म्हणाल्या की, नवनीत राणा म्हणजे चाराणे की मुर्गी आणि बाराणे का मसाला आहेत, असं म्हणत नवनीत राणांवरही हल्लाबोल चढवला.

दरम्यान सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, लोकसभा किंवा विधानसभा लढण्याची माझी तयारी नाही. मी कनिष्ठ मध्यमवर्गी आहे. कोणत्याही जाती-धर्मात न गुंतून जाता महाराष्ट्र धर्म वाटवण्याची लढाई शिवसेनेला लढायची होती त्यासाठी शिवसेना कटीबध्दपणे काम करत आहे. त्यामुळे विधानसभा माझ्या डोक्यात नाही. लोकसभेला ठाकरे गटाकडून १३ पेक्षा जास्त जागा जिंकल्या जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नवनीत राणांवर सुषमा अंधारेंची टीका

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अमरावतीच्या भाजप खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना चांगलाच हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या, जसा बाईचा विनयभंग होतो, तसा पुरुषाचाही विनयभंग होत नसेल का ? जेव्हा नवनीत राणा म्हणतात की, उध्दव ठाकरेंमध्ये दम नाही, तेव्हा त्याचा आम्ही काय अर्थ काढायचा ? नवनीत राणा म्हणजे चाराणे की मुर्गी, आणि बाराणे का मसाला आहेत असं म्हणत, अंधारे यांनी नवनीत राणांवर हल्ला चढवला आहे.

Updated : 23 April 2024 5:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top