News Update
Home > मॅक्स वूमन > जिच्या हातामध्ये ऑलिम्पिकची मशाल होती, ती खेळाडू करते 167 रुपये रोजंदारीवर काम

जिच्या हातामध्ये ऑलिम्पिकची मशाल होती, ती खेळाडू करते 167 रुपये रोजंदारीवर काम

जिच्या हातामध्ये ऑलिम्पिकची मशाल होती, ती खेळाडू करते 167 रुपये रोजंदारीवर काम
X

Photo courtesy : social media

आपल्या देशातील लोक एखादी गोष्ट लवकर विसरून जातात. असंच काहीस देशातील खेळाडू किंवा इतर काही क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या बाबतीतही घडत असतं. एकीकडे, नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी मेडल्स मिळवणाऱ्या खेळाडूंचं कौतुक केलं जात आहे, तर दुसरीकडे काही खेळाडू ज्यांनी देशासाठी चांगले काम केले आहे. त्या खेळाडूंचा देशाला विसर पडतो. ज्यांनी ऐन उमेदेची वर्ष देशासाठी दिली. त्या खेळाडूंना सरकारने मदत करणं अपेक्षित असतं. मात्र, तसं होताना दिसत नाही.

आपल्या देशाची अशीच परंपराच राहिले आहे. आनंदाच्या प्रसंगी खेळाडूंना डोक्यावर घ्यायचं आणि मग त्या ठरावीक क्षणांसाठी नायक केलेल्या खेळाडूंना असं विसरून जायचं की, ते कधी अस्तित्वातच नव्हते. एक खेळाडू खूप मेहनतीने पदक जिंकत असतो. मात्र, हे विसरण्यासाठी लोकांना आणि विशेषतः सरकारला जास्त वेळ लागत नाही. सरकारने केलेल्या अशाच एका दुर्लक्षाचे अत्यंत दुःखद उदाहरण आसाममधून समोर आलं आहे.

जनज्वार ने दिलेल्या वृत्तानुसार 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत ऑलिम्पिक मशाल हाती घेऊन धावणाऱ्या पिंकी कारमारकरची सध्या परिस्थिती बिकट आहे. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये, आसामच्या दिब्रूगड जिल्ह्यातील 17 वर्षीय पिंकी कारमारकर ऑलिम्पिक मशाल घेऊन लंडनच्या रस्त्यांवर धावली होती. आणि जेव्हा पिंकी तिच्या राज्यात परतली, तेव्हा तिचं असं स्वागत झालं जसं की, एखाद्या ऑलम्पिक पदक विजेत्याचं होतं.

डिब्रूगढचे तत्कालीन खासदार सर्वानंद सोनोवाल पिंकीला घेण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. पिंकी ओपनटॉप गाडीमध्ये बसली होती. आणि तिची मिरवणूक जिथून जाईल तिथे सगळीकडे लोक तिचा जयजयकार करत होते.

पण या देशातील लोकांची आणि सरकारांची स्मरणशक्ती इतकी विसराळू आहे की, एकेकाळी नायक असलेल्या व्यक्तीची स्थिती किंवा त्यांची परिस्थिती पाहण्यासाठी कोणाकडे वेळ नाही.

त्याकाळात तिला केलेली आश्वासन ना सरकारने पूर्ण केली ना नेत्यांनी. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकच्या तिचं मशाल घेऊन धावणाऱ्या पिंकीला आज स्वतःचं आणि तिच्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी काम करणं भाग पडलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पिंकी करमाकरला आसामच्या चहाच्या बागेत रोज 167 रुपये पगारावर काम करायला जावं लागतं. पिंकी सध्या बोरबोरुआ चहाच्या बागेत मजूर म्हणून काम करत आहे. पिंकी तिच्या शाळेत युनिसेफचा स्पोर्ट्स फॉर डेव्हलपमेंट कार्यक्रमही चालवत होती आणि दररोज संध्याकाळी 40 निरक्षर महिलांना शिकवत होती. तीच पिंकी आता घरातील कमावणारी एकमेव व्यक्ती आहे.

पिंकीचं आयुष्य गेल्या दहा वर्षांपासून खूप अडचणींमधून जात आहे. पिंकीने या दहा वर्षांत बरंच काही पाहिलं असून ती अशा परिस्थिती येऊन पोहोचली आहे की जिथे तिला अन्नासाठी सुद्धा तरसावं लागत आहे. पिंकी सांगते की, तिला सरकारकडून मदतीची खूप अपेक्षा होती. पण असं काहीही झालं नाही. पिंकीला फक्त निराशाचं हाती आली.

तिची मोठं मोठी स्वप्न होती, आणि ती पूर्ण करण्यासाठी ती प्रयत्न करत होती. मात्र, प्रतिकूल परिस्थितीत ती एकटी पडली. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे पिंकीला सरकारची कोणतीही मदत मिळाली नाही.

"माझी मोठी स्वप्नं होती. पण आता कोणतीही आशा उरलेली नाही. माझ्या आईच्या मृत्यूनंतर मला पैसे नसल्याने कॉलेज सोडून द्यावं लागलं. आणि मी माझं घर चालवण्यासाठी चहाच्या बागेत काम करू लागले." असं पिंकी सांगते.

पिंकी सांगते की, तिच्या विजयाने एकेकाळी सर्व तिचे कौतुक करत होते. मात्र, आज कोणीही तिच्या मदतीला येत नाही. ""सरकार आणि युनिसेफने मला मदत केली नाही. आजपर्यंत मला कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. खरं तर हे आहे की, कामगारांची मुलगी कामगारच बनली." असं पिंकी खेदाने सांगते.

दरम्यान माध्यमांमध्ये आलेले वृत्त पाहून आसाम सरकारला जाग आली असून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी पिंकीची भेट घेऊन तिला सरकार मदत करेल. असं आश्वासन दिलं आहे.

Updated : 14 Aug 2021 8:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top