नंबर १ आशिकीगर्ल - श्रद्धा कपूर
X
'स्त्री' चित्रपट चर्चेत असलेली आशिकी गर्ल श्रद्धा कपूर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनलेली आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारितस्कोर श्रद्धा कपूर ही इन्स्टाग्रामवर नंबर १ स्थान पाटकावण्यात यश मिळवलं आहे. असं पहिल्यांदा झालं असेल की, श्रद्धाने आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण सारख्या अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. इंस्टाग्रामवर अलिया भट्ट ८५ गुणांसह दुस-या स्थानावर पोहोचली आहे. दीपिका पादुकोण ६८ गुणांमुळे तिस-यास्थानी तर प्रियांका चोप्रा ६६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सोनम कपूर अहुजा ५९ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. श्रद्धा कपूर १०० गुणांसह सर्वश्रेष्ठ बनली आहे.
राजकुमार राव सोबत फिल्म स्त्री आणि शाहिद कपूर सोबतची फिल्म बत्ती गुल मीटर चालू मूळे तिची बरीच पब्लिसिटी होतेय. श्रध्दाच्या इन्स्टा पोस्ट आणि इन्स्टा स्टोरीज असतात. त्यामुळेच तर श्रध्दाच्या इन्स्टाग्रामच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे.