Home > मॅक्स वूमन > आपण आपल्या कामातुन बोलुयात...

आपण आपल्या कामातुन बोलुयात...

आपण आपल्या कामातुन बोलुयात...
X

ग्लॅमरच्या जगात काम करत असताना स्त्रीला बाह्यरूपाबद्दल खूपच मत-मतान्तरचा सामना करावा लागतो. मात्र अशी मते तयार करण्यास आपणच कारणीभूत असतो. एकदा का लोकांना तुम्हाला मेकअप शिवाय बघायची सवय लागली की मग त्यात त्यांना वावगे काही वाटत नाही. मात्र आपण जर लोकांच्या मताप्रमाने स्वत:ला त्यात बंदिस्त करायला लागलो तर गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात.

सुंदर दिसण म्हणजे काय? त्याची व्याख्या काय ? हे प्रश्न आपणच आपल्याला विचारायला हवेत. व्यायाम करून स्वत: ताजेतवाने राहणे केव्हाही उत्तम त्याला पर्याय असूच शकत नाही. जे आहेत ते तात्पुरते आहेत. ते पर्याय केवळ लोकांच्या सुंदरतेच्या व्याख्येत स्वत:ला बसवण्यासाठी असतील तर तो अट्टहास आपण सोडला पाहिजे. खरेतर आपण आपल्या शरीराला आहे तसे स्विकारले की मग हे प्रश्नच उभे राहत नाहीत. आपल्या शरीराबद्दलची असुरक्षित भावनाच आपल्याला या तात्पुरत्या पर्यायाकडे ओढत नेते. आजही अनेक अभिनेत्री शूटिंगची गरज नसेल तर बिना मेकअप फिरतात आणि नुसत्या फिरत नाहीतर त्या ते मिरवतातही, ते मला योग्य वाटते अनेकदा मला स्वत:ला लोक येऊन सांगता कि " बिना मेकअप तुम्ही जास्त छान दिसतात" या सगळ्यात मला एक गोष्ट महत्वाची वाटते दिसण्यापेक्षा आपण आपल्या कामातून बोलुयात.

जुही गडकरी, अभिनेत्री

Updated : 27 Feb 2018 4:45 PM GMT
Next Story
Share it
Top