Home > Election 2020 > प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा आयपीएस असोशिएशनकडून निषेध, तर प्रज्ञासिंह यांनी मागे घेतलं वक्तव्यं

प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा आयपीएस असोशिएशनकडून निषेध, तर प्रज्ञासिंह यांनी मागे घेतलं वक्तव्यं

प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा आयपीएस असोशिएशनकडून निषेध, तर प्रज्ञासिंह यांनी मागे घेतलं वक्तव्यं
X

मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी आणि भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्या बाबत संतापजनक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा आयपीएस असोशिएशननं निषेध केला आहे. साध्वी यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून भाजपवर टीका सुरू झालीय. दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलेलं आहे.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान साध्वी यांनी हेमंत करकरेंचा मृत्यु शाप मिळाल्यानं झाल्याचं संतापजनक वक्तव्यं केलं होतं. काँग्रेसनं यावरून भाजपवर टीका केलीय. तर भाजपनं साध्वी यांचं करकरे यांच्यासंदर्भातलं वक्तव्यं हे वैयक्तिक असल्याचं स्पष्ट केलंय. हेमंत करकरे हे मुंबई एटीएसचे प्रमुख असतांना २६ नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. या शौर्यासाठी त्यांना २००९ मध्ये मरणोत्तर अशोक चक्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

२००६ मध्ये मालेगाव मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासात करकरे यांनी प्रज्ञसिंह यांचीही चौकशी केली होती. त्यानंतर साध्वी यांना शिक्षाही झाली होती. सध्या साध्वी प्रज्ञासिंह जामिनावर सुटलेल्या असून त्या भाजपच्या तिकिटावर भोपाळमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.

Updated : 19 April 2019 5:24 PM GMT
Next Story
Share it
Top