मुस्लिम मतदारांनी मतं दिली तरी किंवा नाही दिली तरी मी निवडून येणारच आहे. मी निवडून आल्यानंतर मुस्लिम माझ्याकडे येतात, मग मी विचार करते आणि म्हणते राहू द्या...काय फरक पडतोय, असा गर्भित इशाराच भाजपच्या नेत्या मनेका गांधी सुलतानपूरमध्ये दिला आहे. मनेका या पिलीभत या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी त्यांनी सुलतानपूरमधील तौराभखानी इथल्या सभेत हे वक्तव्यं केलंय. मनेका यांची त्या सभेतील व्हिडिओ क्लिप झपाट्यानं व्हायरल झाली आहे.
नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
‘मै जीत रही हूँ, मै जीत रही हूँ...लोगों की मदद्, प्यार से मै जीत रही हूँ. लेकीन अगर मेरी जीत मुसलमानों के बगैरे रूकी तो मुझे बहोत अच्छा नहीं लगेगा. क्युकी मै बता देती हूँ, फिर दिल खट्टा हो जायेगा. फिर जब मुसलमान आता है काम के लिए फिर मै सोचती हूँ की फिर रहने दो, क्या फर्क पडता है. आखिर नोकरी, सौदेबाजी भी तो होती है. बात सही है क्या नहीं. ये नहीं के हम सभी महात्मा गांधी की छटी औलाद है, के हम केवल देते ही जायेंगे, देते ही जायें
Updated : 12 April 2019 4:57 PM GMT
Next Story