Home > मॅक्स वूमन > शेतावर जायला निघाली आणि पोहोचली अजगराच्या पोटात.....!

शेतावर जायला निघाली आणि पोहोचली अजगराच्या पोटात.....!

शेतावर जायला निघाली आणि पोहोचली अजगराच्या पोटात.....!
X

वा टिबा हि ५४वर्षीय इंडोनेशियन महिला गुरुवारी संध्याकाळी आपल्या शेतात जाण्यासाठी निघाली मात्र काही अंतरावरच असलेल्या शेतात ती पोहोचू शकली नाही. रात्री उशीराही ती घरी न पोहोचल्याने बहिणीने शोधाशोध सुरु केली. टिबाची चप्पल तसेच टाॅर्च व्यतिरिक्त काहीही सापडले नाही.

पोलिसांसोबत गावक-यांनीही टिबाचा शोध सुरु केला त्याचवेळेस टिबाच्या शेताजवळ जगातील सर्वात लांबीच्या अजगरांचे निवासस्थान असलेल्या गुहा असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले,तसेच एक २३ फूट लांबीचा अजगर गावाजवळ अढळला. गावक-यांनी या अजगराला ठार केले व त्याचे पोट फाडले तर त्यात टिबाचा मृतदेह अढला. हे दृश्य पाहून सर्वच गावकरी अचंबित आहेत.अजगराने संपुर्ण मनुष्य गिळंकृत करण्याची ही इंडोनेशियातील दुसरी घटना आहे. या घटनेने सर्वच लोक भयभीत झाले आहेत.दुर्मिळ समजले जाणारे हे अजगर मनुष्यांवर का हल्ला करत आहेत ? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

[video width="640" height="352" mp4="http://maxmaharashtra.com/wp-content/uploads/2018/06/WhatsApp-Video-2018-06-18-at-2.45.05-PM.mp4"][/video]

Updated : 18 Jun 2018 11:42 AM GMT
Next Story
Share it
Top