भावा बहिणीच्या शिक्षणासाठी तिने संपवले आपले आयुष्य...
X
शेतक-यांच्या आत्महत्येचे सत्र अजून काही संपताना दिसत नाही उलट शेतकऱ्याबरोबरच त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे आत्महत्या सत्र सुरु होते की काय? अशी भिती व्यक्त केली जात आहे. शाळेच्या पाससाठी पैसे नाहीत म्हणून लातुर येथील शेतक-यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे. आता आपल्या शिक्षणाच्या खर्चासाठी वडिलांची ओढाताण होते. या चिंतेतून ईश्वरवठार (ता. पंढरपूर) येथील अनिशा हनुमंत लवटे (१७) हिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
हनुमंत काशिनाथ लवटे यांना दोन मुली व एक मुलगा आहे. अनिशा ही पॉलिटेक्निकल कॉलेजला डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिकच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. शिक्षणाचा वाढता खर्च करताना वडिलांची होणारी ओढाताण अनिशाला बघवत नव्हती. म्हणून घरी पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन तिने आपले जीवन संपविले. आपल्या शिक्षणाचा खर्च वडील करू शकत नाहीत, आपण गेल्यावर आपली बहीण, भाऊ यांना वडील चांगले शिक्षण देतील, असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे.
बेटी बचाव बेटी पढावच्या मोहिम ज्या देशात सुरु आहे. तेथील जन्माला आलेल्या मुलींना स्वतःचे आयुष्य अशा रितीने संपवावे लागत असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.