Home > Election 2020 > निवडणूका आल्या- गेल्या... अंधार कायम

निवडणूका आल्या- गेल्या... अंधार कायम

निवडणूका आल्या- गेल्या... अंधार कायम
X

निवडणूका म्हणजे आश्वासनांचा पाऊस,,, राजकीय नेत्यांकडून दिल्या जाणा-या आश्वासनांवर विसबून राहण्या-या मतदारांची केवळ निवडणूकीपुरती बोळवण केली जाते. शहरी भागातील मतदारांना या आश्वासनांची झळ कमी प्रमाणात बसत असली तरी ग्रामीण भागात मात्र ती अधिक जाणवते. मुलभूत गरज असलेली रस्ते, वीज या सुविधाही त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नसल्याने गावे विकासाशी जोडलीच जात नाहीत.

सातारा जिल्ह्यातील परळी या दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवरील मतदारांची अवस्था अशीच झाली आहे. गावात सतत लपंडाव करीत असलेल्या वीजेचा प्रश्न सोडवू हे नेत्यांचे आश्वासन केवळ मतदानापुरतेच होते याची जाणिव आता ग्रामस्थांना होते आहे. लोकसभेची निवडणूक आली, प्रचाराचा धुरळा उठला आश्वासनांची खैरात झाली. मतदानही झाले मात्र, या गावांतील अंधार कायम आहे.

सातत्याने वीज जात असल्याची तक्रार स्थानिक वीज कार्यालयात केल्यास त्याची कुणी दखल घेत नाही. तर दुसरीकडे रस्ते नसतानाही पोहोचण्याचा प्रयत्न करणा-या नेत्यांच्या गाड्या मतदान संपताच दिसेनाश्या झाल्या. त्यांचा संपर्कही तुटला. आता या गावात मागे राहिला आहे तो अंधार आणि वीजेच्या मोडक्या डीपीवर गुंडाळलेल्या चिंध्या.

Updated : 3 May 2019 11:23 AM GMT
Next Story
Share it
Top